घरताज्या घडामोडीकोरोना रुग्णाला रेमडेसिवीर ऐवजी दिलं Acidityचे इंजेक्शन!

कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर ऐवजी दिलं Acidityचे इंजेक्शन!

Subscribe

राज्यात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही आहे. यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. पण यादरम्यानच रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचा घटना समोर येत आहे. अशातच एका रुग्णालयातील वॉर्डबॉयने रुग्णाला रेमडेसिवीर ऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन दिल्याची खळबळजनक घटना नागपुरमधील जामठा येथे घडली आहे. नागपुरच्या सिताबर्डी पोलिसांच्या तपासा दरम्यान ही घटना समोर आली आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य कर्मचारी आणि एक महिला डॉक्टरच काळाबाजार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ४ आरोग्य कर्मचारी आणि एक महिला डॉक्टराला अटक केली आहे. सुदैवाने अत्यवस्थ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून ते घरी सुखरुप परतले आहेत.

नक्की काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी त्यांच्या ताब्यात दिली होती. तर त्यावेळेस आरोपीच्या (वॉर्डबॉय) मित्राला रेमडेसिवीर द्यायचे होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या रेमडेसिवीरपैकी दोन इंजेक्शन चोरले. मग त्या रेमडेसिवीर ऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन त्याला दिले आणि दोन रेमडेसिवीर त्याच्याकडे ठेवले. जास्त पैसे घेऊन दुसऱ्या विकण्याचा त्याचा उद्देश होता. त्याप्रमाणे त्याने स्वतः रुमवर आणून ठेवले. जो रुम पार्टनर होतो आरोप नंबर २, हा सुद्धा एक वॉर्डबॉय आहे. त्याने ते परत चोरले आणि ३५ हजार रुपयाला एक विकण्यासाठी ते एका ठिकाणी जमले होते. त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकून पकडले आणि ४ आरोग्य कर्मचारी आणि एका महिला डॉक्टराला अटक करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड झालेल्या विमानाचे सुरक्षित लँडिंग


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -