नाशिकचे माजी मंत्री घोलपांवर सोलापूरात फेकले काळे ऑईल

आत्महत्या प्रकरणातील संशयितांना वाचविल्याच्या वादातून घटना घडल्याची चर्चा

Baban Gholap
बबनराव घोलप

सोलापूर – शिवसेनेचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत सोलापुरात झालेल्या समाज संघटनेच्या मेळाव्यात एका तरुणाने घोलप यांच्या अंगावर काळे ऑईल फेकले.

संघटनेतील स्थानिक वादातून हा प्रकार घडला. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये राष्ट्रीय चर्मकार संघटनेचा मेळावा आयोजिला होता. त्यावेळी घोलप यांच्यासह काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा लांबतुरे, नगरसेविका संगीता जाधव, श्रीदेवी फुलारे आदींची उपस्थिती होती. त्यावेळी काही तरुणांनी गोंधळ घातला. त्यांचा आक्षेप असा होता की, संघटनेचे स्थानिक नेते अशोक लांबतुरे व त्यांच्या पत्नी सुरेखा लांबतुरे आदींच्या छळाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहात पत्र लिहून आत्महत्या केली होती.