घरताज्या घडामोडीरत्नागिरीतील घरडा केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू

रत्नागिरीतील घरडा केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू

Subscribe

रत्नागिरीतल्या खेड एमआयडीसी (MIDC) मध्ये घरडा केमिकल प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या प्लांटमध्ये एकापाठोपाठ दोन स्फोट झाले आहेत. या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसंच या प्लांटमध्ये ४०- ते ४५ कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरडा केमिकल प्लांट सर्वात मोठी केमीकल कंपनी असल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घरडा केमिकल प्लांटच्या 7B मध्ये स्फोट झाले आहेत. ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस सकाळच्या शिफ्टला आलेले कामगार कंपनीत होते. ४० ते ५० कामगार कंपनीत असतात. परंतु, नाश्ताची वेळ झाल्याने काही कामगार खाली आले होते. तर उर्वरीत कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटात पाच कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे.

- Advertisement -

Lote MIDC Blast :  लोटे एमआयडीसीत भीषण स्फोट, चार कामगारांचा मृत्यू

जखमी कामगाराला मुंबईला हलवणार

दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्या एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे. या कामगाराला तातडीने मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. बॉयलरच्या स्फोटामुळे कंपनीत भीषण आग लागली. या आगीने अनेक कामगारांना आपल्या कवेत घेतलं. त्यामुळेच काहींचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -