Homeमहाराष्ट्रBhandara Ordnance Factory Blast : भंडाऱ्यातील आयुध निर्माण कारखान्यात स्फोट, आठ कर्मचाऱ्यांचा...

Bhandara Ordnance Factory Blast : भंडाऱ्यातील आयुध निर्माण कारखान्यात स्फोट, आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Subscribe

भंडारा येथील आयुध अर्थात शस्त्र निर्माण कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याचे समोर आले आहे.

Bhandara Ordanance Factory Blast : भंडारा : भंडारा येथील आयुध अर्थात शस्त्र निर्माण कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट असल्याचे समोर आले आहे. या कारखान्याच्या आरके विभागात हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटाचे काही फोटो देखील समोर आले आहेत. त्यात शस्त्र बनवण्यात येणारे जड साहित्य इतस्ततः पडलेले दिसते आहे. या स्फोटानंतर आकाशात बराच काळ काळा धूर दिसत होता. या स्फोटानंतर कारखान्यात आग लागली. या स्फोटात छत कोसळलं आहे. याखाली 10 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 जण अडकले होते, त्यातील केवळ दोघांनाच वाचवण्यात यश आहे आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी ही माहिती दिली. (blast in bhandara ordanance factory roof collapse people trapped)

घटना घडल्याचे कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्याला तात्काळ सुरुवात झाली. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, या भागात एकच गोंधळ उडाला. आणि लोक इकडे – तिकडे धावू लागले. घटनास्थळी लोकांची देखील गर्दी झाली जे मदतीसाठी तात्काळ पुढे आले.

हेही वाचा – Nana Patole : महाराष्ट्राला दारूराष्ट्र बनविण्याचा प्रयत्न, दावोसवरून नाना पटोलेंचा निशाणा

शुक्रवारी सकाळी 10.30 च्या आसपास हा स्फोट झाला. यावेळेस कारखान्यात 14 कर्मचारी काम करत होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच लोकांना गंभीर अवस्थेत तेथून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. कारखान्यातील अधिकाऱ्यांसोबतच अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी देखील मदतकार्य करत आहेत.

महाराष्ट्रातील भंडारा येथे असलेल्या आयुध निर्माणीच्या आवारात गेल्या वर्षी 27 जानेवारी 2024 रोजी देखील स्फोट झाला होता. या स्फोटात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर 2016 मध्ये नागपुरातील पुलगाव येथील लष्कराच्या सर्वात मोठ्या हत्यारांच्या गोदामाला आग लागली होती. यात दोन अधिकाऱ्यांसोबत एक जवान आणि 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – Sanjay Raut On Shah : शहांना समांतर शिवसेना निर्माण करायची आहे, काय म्हणाले संजय राऊत

आयुध निर्माण म्हणजे नेमके काय

भारतीय आयुध निर्माण फॅक्टरी ही भारतीय संरक्षण मंत्रालयासाठी कार्यरत असते. संरक्षणासाठी आवश्यक शस्त्रे येथे बनवली जातात. याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.