Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE रक्तदान गरजेचे, पण जास्त रक्त संकलित झाल्यास वाया जाण्याची शक्यता

रक्तदान गरजेचे, पण जास्त रक्त संकलित झाल्यास वाया जाण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

राज्य़ात कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची भीती राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून वर्तवण्यात आली होती. दरम्यान राज्यातील विविध ठिकाणच्या रक्तपेढ्यांमध्ये अवघे २० हजार रक्तसाठा उपलब्ध असल्याने सरकारकडून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघ्या एका महिन्यात ३० हजार युनिट रक्त संकलन झाले असून राज्यातील रक्तसाठा ५० हजारांवर पोहचला आहे. हा रक्तसाठा जवळपास महिनाभर पुरण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली.

सध्या उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्यामुळे रक्त टंचाईचे संकट ओसरले असले तरी राज्याला प्रत्येक महिन्याला एक ते दीड लाख युनिटची गरज लागते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील दोन महिने महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रक्तपेढ्यांच्या गरजेनुसार पुढील काही दिवसांत सामाजिक संस्था आणि सोसायट्यांनी टप्प्याटप्प्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले पाहिजे असे सांगितले जाते.

- Advertisement -

दरम्यान राज्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, उद्योग कंपन्यांमध्ये आयोजित रक्तदान शिबिरांतून एक महिना पुरेल एवढा रक्तसाठा जमा झाला आहे. मात्र एकाच दिवशी किंवा एकाच महिन्यात मोठ्याप्रमाणात रक्त संचलित केल्यास फारसा उपयोग होणार नाही. दरम्यान अनेक रक्त साठा वाया जाऊ शकतो, त्यामुळे नियमितपणे छोटी-छोटी शिबिरे आयोजित केली पाहिजे असे आवाहन शहरातील ब्लड बँकांनी सांगायला सुरुवात केली आहे.

दरम्यान अनेक ब्लड बँकांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा असल्याने यापुढे छोटी छोटी रक्तदान शिबिरे नियमितपणे सुरु राहिली तर यापुढेही राज्य़ात रक्ताची टंचाई निर्माण होणार नाही अशी आशा अनेक रक्तपेढी संचालकांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

तसेच रक्ताचा उपयोग होण्यासाठी ९, १६, २३ आणि ३० मे रोजी रक्तदान शिबिरे घेतली तर त्याचा उपयोग जून आणि जुलै महि्न्यात होऊ शकतो. परंतु शिबिरांसाठी रक्तपेढी सध्या मिळेनाशा झाल्या आहेत. असे मत काही डॉक्टर व्यक्त करत आहेत.

यात राज्य सरकारने लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करु नये असा नियम घालून दिला आहे. मात्र परदेशात लस घेतल्यावर १४ दिवसांमध्ये केव्हाही रक्तदान करु शकतात. दरम्यान १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. यात प्रत्य़ेकाला लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एकूण साठ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने जून- जुलै महिन्यात सगळीकडेच रक्ताचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे आपल्याकडील नियमात बदल करावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा असल्याचे पुणे विभागीय रक्तपेढीचे डॉ. शंकर मुगावे यांनी सांगितले आहे.दरम्यान एकाच दिवशी किंवा महि्न्यात अनेकवेळा घेण्यापेक्षा टप्प्यटप्प्याने शिबिरे घेतली पाहिजे कारण तरच राज्यात रक्तसाठा मुबलक प्रमाणात राहून शकतो. त्यामुळे रक्ताचा गरजू रुग्णांना उपयोग होतो. असे मत डॉक्टर व्यक्त करत आहेत.

दरम्यान गेल्या वर्षभरात राज्यातील बहुतांश रक्तपेढ्याना रक्त मिळविण्यासाठी रक्तदान शिबिरांवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदाच्या या कोरोना काळात मात्र जे रक्तदात्यांकडून रक्त मिळविण्याचे मुख्य स्रोत होते तेच आटले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी, कॉर्पोरेट ऑफिसेस लॉकडाऊनमुळे बंद असल्याने रक्तासाठी फक्त सामाजिक संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आपल्या राज्याची गरज पाहता येत्या काळात नियमित शस्त्रक्रिया सुरु झाल्या असल्यामुळे रक्ताची नितांत गरज भासणार आहे. त्यामुळे आता फक्त रक्तदान करा असे आवाहन करण्यापेक्षा सोसायट्यांमध्ये रक्तदानाची शिबिरे आयोजित करण्यावर भर देण्याची गरज आहे. कारण रक्ताची टंचाई महाराष्ट्र सारख्या राज्याला परवडणारी नाही. कारण राज्यात रुग्णालये मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरच्या राज्यातूनही रुग्ण आपल्या राज्यात वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येत असतात.


 

- Advertisement -