घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर'या' देवीच्या मंदिरात वाहतात रक्ताचे पाट

‘या’ देवीच्या मंदिरात वाहतात रक्ताचे पाट

Subscribe

 नाशिक : भारतात असंख्य मंदिर आहेत आणि त्या मंदिरांतील पुजा, विधी, परंपरा वेगवेगळ्या आहेत. जस सध्या नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी बोकडबळीच्या प्रथेवरून वाद निर्माण झाला आहे. २०१७ साली या प्रथेवर बंदी टाकण्यात आली होती, त्या बंदीच्या निर्णयाच्या विरोधात भक्त न्यायलयात गेल्यानंतर न्यायलयाने ती बंदी उठवली. त्यामुळे यंदा पुन्हा दसर्‍याच्या दिवशी शेकडोंच्या संख्येने बोकडबळी दिले जाणार आहेत. आता, या बोकडबळीला साधू महंतांनी विरोध केल्याने काहीसा वाद निर्माण झाला आहे. अश्याच प्रकारच्या अनेक प्रथा देश भरात विविध ठिकाणी बघायला मिळतात. केरळ राज्यातील कोंडूगल्लुर येथील कुरूंभा भगवती देवी मंदिरात एक परंपरा आहे. याठिकाणी सात दिवस चालणार्‍या भरणी उत्सवात अक्षरशः रक्ताचे पाट वाहतात. देवीच्या नावाने लाखोल्या वाहणारे गाणी म्हणत, देवीला वाहण्यात येणारे हार, ओटी अर्पण न करता मूर्तीवर फेकल्या जातात.  

भरणी उत्सव

कोडुंगल्लूर भगवती मंदिरातील भरणी उत्सव केरळमधील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे. कुंभम या मल्याळम महिन्यातील भरणी नक्षत्रापासून मीनम महिन्यात भरणी नक्षत्रानंतर ७ दिवसांपर्यंत हा उत्सवाचा महिना आहे. हे साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिन्यात येते. या उत्सवाची सुरुवात सामान्यतः ‘कोझिक्कल्लू मूडल’ नावाच्या विधीने होते ज्यात कोंबड्यांचा बळी देणे आणि त्यांचे रक्त सांडणे समाविष्ट आहे, जे या मंदिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उत्सवाचा आणखी एक प्रमुख भाग म्हणजे ‘कावू थेंदळ’. भद्रकाली क्रांगनोरच्या राजघराण्याचा संरक्षक असल्याने, कोडुंगल्लूरचा राजा उत्सवात सक्रिय भाग घेतो. वडाच्या झाडाभोवती बांधलेल्या व्यासपीठावर उभे राहून, देवी मंदिराचा दरवाजा उघडल्यानंतर लगेचच राजा रेशमी छत्र पसरवतो. हा हावभाव सर्व जातींना पूजेसाठी मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी दर्शवते. हे पाहिले जाऊ शकते की हा सण बहुधा अशा प्रकारचा पहिलाच आहे ज्यामध्ये जाती आणि पंथाची पर्वा न करता सर्व स्तरातील लोकांचा समावेश आहे. 

- Advertisement -
रक्तरंजित प्रथा 

 याचसोबत कोडुंगल्लूर भगवती मंदिरात दरवर्षी सात दिवसाच्या भरणी उत्सवात लाल पोशाख घातलेले आणि तलवारी घेऊन पुरुष आणि स्त्रिया बेधुंद होऊन पीएलटी सुटतात ते तलवारीने स्वतच्याच डोक्यावर वार करतात. त्यांच्या डोक्यातून वाहणार्‍या रक्ताचे शिंतोडे उडवत ते मंदिरात प्रवेश करतात, याच दरम्यान ते देवीला लाखोल्या वाहणारी गाणी म्हणतात. देवीला अर्पण करण्यासाठो आणलेले हार, ओटी आदि वस्तु सामान्य पद्धतीने देवीला अर्पण न करता त्याऐवजी ते देवीच्या मूर्तीवर फेकले जातात. या रक्तरंजित परंपरेमुळे मंदिराच्या आवारात इतके रक्त जमा होते की  रक्ताचे डाग स्वच्छ करण्यासाठी मंदिर उत्सवानंतर ७ दिवस बंद ठेवावे लागते. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -