Homeमहाराष्ट्रBuldhana Hair Loss : केस गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांचे नमुने पुन्हा घेतले, कारण...

Buldhana Hair Loss : केस गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांचे नमुने पुन्हा घेतले, कारण काय?

Subscribe

महिनाभरापूर्वी शेगाव येथील लोकांना अचानक पडू लागलेले टक्कल चर्चेचा विषय बनला होता. या गोष्टीला आता महिना उलटला असतानाच पुन्हा एकदा केस गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांचे पुन्हा नमुने आयसीएमआरच्या प्रतिनिधींच्या पथकाकडून आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून घेतले जात आहे.

बुलढाणा : महिनाभरापूर्वी शेगाव येथील लोकांना अचानक पडू लागलेले टक्कल चर्चेचा विषय बनला होता. या समस्येमुळे गावामधील वातावरण संपूर्णपणे बदलून गेले होते. पाण्याचे नमुने तपासून किंवा आरोग्य अधिकाऱ्यांनी भेटी देऊनही समस्येत फार काही फरक पडला नव्हता. राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली होती. या गोष्टीला आता महिना उलटला असतानाच पुन्हा एकदा केस गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांचे पुन्हा नमुने आयसीएमआरच्या प्रतिनिधींच्या पथकाकडून आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून घेतले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Blood samples of patients with hair loss in Buldhana were taken again)

बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या जवळपास 15 गावात महिनाभरापासून केसगळतीची समस्या भेडसावत आहे. या आजारात सुरुवातीला लोकांना डोक्यात खाज येण्यास सुरुवात होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जवळपास सगळे केस गळतात आणि टक्कल पडते. केवळ पुरुषच नाही तर महिलांना देखील याचा त्रास झाला आहे. अनेक दिवसांपासून या आजाराचे कारण समोर येत नव्हते. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार रुग्णांच्या रक्तात आणि केसात सेलेनियम या जड धातूचे प्रमाण आढळून आले. सेलेनियम हे केसगळतीचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. 15 गावातील नागरीक जो गहू खातात, त्यातून त्यांच्या शरीरात सेलेनियम गेल्याचा अंदाज लावला गेला. यानंतर तपासणी केली असता, या सेलेनियममुळेच ही केस गळती होत असल्याचा अहवाल समोर आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – Nanded : उपचारासाठी लोकांनी तुमच्या निधीची वाट पहायची का? नांदेड मृत्यूतांडव प्रकरणी न्यायालयाचा सवाल

केस गळतीच्या आजारावर अद्यापही काही उपाय सापडला नसला तरी महिन्यापूर्वी आयसीएमआरच्या पथकाने ज्या नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले होते, त्यांच्या रक्ताचे नमुने पुन्हा घेण्यात येत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याप्रकरणी माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते म्हणाले की, ज्या लोकांच्या रक्ताचे नमुने महिन्यापूर्वी घेतले होते, त्यांच्यामध्ये काही सुधारणा झाली आहे का? हे आम्ही तपासून पाहणार आहोत. यासाठीच आयसीएमआरच्या प्रतिनिधींच्या देखरेखीखाली नागरिकांच्या रक्ताचे नमुने पुन्हा घेण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra Politics : जिकडे सत्ता तिकडे ते, खडसेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने चंद्रकांत पाटलांचा टोला