रुग्णांनाही महागाईचा फटका! रक्ताच्या एका बाटलीमागे मोजावे लागणार 100 रुपये अधिक

राज्यातील रक्तपेढ्यांच्या कारभारावर लक्ष केंद्रीत करण्याचे काम रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून केले जाते

blood will be expensive a price hike of rs 100 per bottle proposal submitted maharashtra state govt

गेल्या अनेक इंधन, घरगुती गॅस सिलिंडरसह आता जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. या महागाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. या परिस्थितीचा फटका आता रुग्णांना देखील बसला आहे. रुग्णांच्या जीव वाचविण्यासाठी लागणाऱ्या रक्ताच्या एका बाटलीची किंमत 100 रुपयांनी महाग झाली आहे. त्यामुळे रक्तासाठी आता रुग्णांच्या नातेवाईकांना अधिकचे 100 मोजावे लागणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताची दरवाढ करण्याचे परिपत्रक राज्य रक्त संक्रमण परिषदेला पाठविले आहे. यानंतर दरवाढीचा हा प्रस्ताव राज्य परिषदेने राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

२०१४ नंतर पहिल्यांदाच रक्ताच्या किंमत इतक्या मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. यामुळे रक्त आणि रक्त घटक ( रेड सेल) यांच्या किमतीत 100 रुपये वाढवण्यात आले. मात्र प्लाझ्मा, प्लेट लेट्स आणि क्रायो यांच्या किमतीत वाढ होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यात 363 रक्तपेढ्या आहेत. यातील 76 रक्तपेढ्या या सरकारी आणि महापालिकेच्या आहेत. तर 287 रक्तपेढ्या धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या मालकीच्या आहेत.

धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या मालकीच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या एका बाटलीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सध्या 1450 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र किंमत वाढल्यानंतर हीच बाटली 1550 रुपयांना खरेदी करावी लागणार आहे.

दरम्यान राज्यातील लोकसंख्येच्या तुलनेत १ टक्के रक्त संकलित करणे गरजेचे असते. त्यानुसार महाराष्ट्रातगेली काही वर्षांपासून अपेक्षे पेक्षा अधिक रक्त संकलित होत आहे. 2021 या वपर्षात 16.73 लाख रक्त संकलित झाले. तर 2022 या चालू वर्षात 8.34 रक्त आत्तापर्यंत संकलित झालेय. मात्र राज्यात रक्ताचा तुटवडा जरी नसला तरी रुग्णांना रक्तासाठी अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी डोनर शोधण्यास सांगाल तर…

अनेकदा रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्याने त्याचे नातेवाईक सोशल मीडियावर मेसेज किंवा पोस्ट करत असतात. रुग्णालयाकडूनही रक्तदानासाठी अपील केले जाते. यात रुग्णाला विशिष्ट रक्त गटाची आवश्यकता असल्याने त्याच्या ओळखीतचे तो मेसेज व्हायरल करतात. यावेळी काही सेवाभावी संस्था किंवा व्यक्ती रुग्णाला रक्त देण्यासाठी पुढाकार घेतात. मात्र काही वेळा शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज भासल्यास रुग्णालयांकडून नातेवाईकांना रक्त मिळवण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले जाते. यामुळे रुग्णांची नातेवाईकांना रक्तासाठी एका रक्तपेढीवरून दुसऱ्या रक्तपेढीकडे धावाधाव करावी लागते. तिथेही रक्त मिळाले नाही तर अनेकांना हातपाय जोडून रक्तदानासाठी अपील करावे लागते. यामुळे रक्तासाठी नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र रुग्ण उपचार घेतलेल्या रुग्णालयाचीच रक्त उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी असून तसे न केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाऊ शकते असा इशारा राज्य रस्त संक्रमण परिषदेने दिला आहे.

राज्यातील रक्तपेढ्यांच्या कारभारावर लक्ष केंद्रीत करण्याचे काम रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून केले जाते. मात्र अनेकदा दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णासाठी धावधाव करावी लागते. अशा परिस्थितीत रक्तदानासाठी पोस्ट किंवा मेसेज व्हायरल होणे ठीक आहे. मात्र काही रक्तपेढ्यांमध्ये ठरावीक रक्तगट किंवा रक्तघटक सहज उपलब्ध असते, अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी दारोदार फिरायला लावणे योग्य नाही, असा शब्दात राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने ठणकावले आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्तगट उपलब्ध असताना रुग्णांच्या नातेवाईकांना दारोदार फिरायला लावणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.


केरळात आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण