प्लास्टिकबंदी: महापालिकेकडून एका दिवसांत ३५४ किलो प्लास्टिक जप्त

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात प्लास्टिकबंदीची (plastic banned) कारवाई सुरू झाली आहे. १ जूलैपासून मुंबई महापालिकेने प्लास्टिकविरोधात कारवाई करण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे.

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात प्लास्टिकबंदीची (plastic banned) कारवाई सुरू झाली आहे. १ जूलैपासून मुंबई महापालिकेने प्लास्टिकविरोधात कारवाई करण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दिवसभरात ३५४ किलो प्लास्टिक जप्त (plastic seized) केल्याची माहिती समोर येत आहे. पालिकेच्या पथकांकडून विविध विभागांत ही कारवाई करण्यात आली आहे. (bmc 354 kg of plastic seized One Day From Various Departments In Mumbai)

प्लास्टिकचा वापर केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शुक्रवारी महापालिकेच्या (BMC) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १ हजार १५३ ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यातून ३५४ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. या कारवाईत ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आल्याचे समजते. मात्र, दंड भरण्यास नकार देण्याऱ्या एका व्यक्तीविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेने एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी आणण्याचे जाहीर केले. महापालिकेकडून मॉलपाठोपाठ दुकाने, बाजारपेठा, फेरीवाले आदी घटकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

प्लास्टिकबंदीच्या निर्णयानुसार उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६च्या कलम ९ अन्वये ही कारवाई केली जात आहे. त्यात पहिल्या गुन्‍ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्‍ह्यासाठी १० हजार रुपये, त्यानंतर तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्लास्टिकच्या वापरात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना कालावधीत महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबतची कारवाई थांबविली होती. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शुक्रवारपासून जोरदार कारवाईस सुरुवात केली आहे. मुंबई पालिकेच्या लायसन्स विभाग, बाजार विभाग, आस्थापना आदी विभागांकडून बडगा उगारण्यात येत आहे.


हेही वाचा – शिंदेंना सेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले… उत्तर देणार