घरताज्या घडामोडीपाणी जपून वापरा! मुंबईत 29-30 नोव्हेंबर रोजी पाणीकपात

पाणी जपून वापरा! मुंबईत 29-30 नोव्हेंबर रोजी पाणीकपात

Subscribe

मुंबईकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत 29 आणि 30 म्हणजेच मंगळवार आणि बुधवार रोजी पाणीकपात करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही ठिकाणचा पाणी पुरवठा 24 तासांकरीता विस्कळीत होणार आहे.

मुंबईकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत 29 आणि 30 म्हणजेच मंगळवार आणि बुधवार रोजी पाणीकपात करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही ठिकाणचा पाणी पुरवठा 24 तासांकरीता विस्कळीत होणार आहे. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मंगळवार 29 नोव्हेंबर सकाळी 8.30 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 8.30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. (bmc announces water cut in various areas of Mumbai on 29 and 30 November)

पवई आणि वेरावली दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पाणी गळती रोखण्यासह इतर कामांचाही समावेश आहे. पवईतील 300 मिमी जलवाहिनी तसेच पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या 1800 मिमी जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या कामामुळे मुंबईतील के-पश्चिम या प्रभागातील पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद असणार आहे. तर, के-पूर्व, एच-पश्चिम, एच-पूर्व, पी-दक्षिण, एस, एल आणि एन या प्रभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा वाढवण्यासाठी आणि पाणीपुरवठ्याचे जाळे आणखी मजबूत करण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने वेरावली ते घाटकोपर दरम्यान, 6.6 किलोमीटरचा बोगदा बांधला जात आहे.

के पश्चिम वॉर्डात राहणार्‍या सुमारे 7.5 लाख लोकांना 24 तासांच्या पाणीकपातीचा फटका बसेल असा अंदाज आहे. ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू यासारख्या ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे. या या प्रभागात असणाऱ्या महापालिकेच्या कूपर रुग्णालयासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

के-पूर्व भागात अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सीप्झ, जोगेश्वरी पूर्व आदी ठिकाणांचा समावेश आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर या भागात 29 नोव्हेंबर रोजी पाणीकपात होणार आहे. तर आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठा कपात होणार आहे. तर, उर्वरित भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

या ठिकाणी कमी दाबाने पाणी

के-पूर्व, जी-उत्तर, पी-दक्षिण या प्रभागात पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, हा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. एच-पश्चिम प्रभागातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्यात येणार आहे. तर, 30 नोव्हेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


हेही वाचा – माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ, पण मी माफी मागतो; रामदेव बाबांना उपरती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -