मुंबई : मुंबई महापालिकेने सन 2024-25 या आर्थिक वर्षांत 6200 कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट ठेवले आहे. त्यापैकी 48.74 टक्के म्हणजेच 3022 कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली करण्यात आली आहे. उर्वरित 3178 कोटींच्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका प्रयत्नशील आहे. कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या काही बिल्डर, उद्योजक, व्यापारी, सोसायटी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांन पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. (BMC seized 3022 properties in mumbai over non payment of property.ः
हेही वाचा : Bangladeshi Citizen : ग्रँट रोड-कांदिवलीतून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक; पोलिसांची कारवाई
नोटीस बजावल्यानंतरही मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या विरोधात मालमत्ता जप्ती आणि जप्त मालमत्ता यांचा लिलाव करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहआयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिले जाते. मात्र कोविड आजारामुळे मुंबईत अनेक उद्योग, कंपन्या, आस्थापना, दुकाने, व्यवसाय बंद पडले आहेत. लाखो लोकांच्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याचा मोठा विपरीत परिणाम उद्योगधंद्यावर एकूणच अर्थव्यवस्थेवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे काहीसा विपरीत परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर सुद्धा झाला आहे. महापालिकेला मालमत्ता कर वसुली करण्यात अडचणी येऊ लागल्या.
त्यातच मोठमोठ्या बिल्डर, कंपन्या, उद्योजक, व्यापारी, सोसायटी आदींनी तब्बल 800 कोटींचा मालमत्ता कर थकीत ठेवला आहे. आता त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी वसुली करण्याचे महापालिकेसमोर आव्हान उभे आहे.
हेही वाचा : Rahul Narwekar : नार्वेकर बिनविरोध विधानसभा अध्यक्ष, ठाकरे गटाचा बहिष्कार, काँग्रेससह पवार गटाकडून स्वागत
मात्र महापालिका मालमत्ता कर विभागाकडून मालमत्ता कर वसुली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जे मोठे मालमत्ता कर थकविणारे आहेत, त्यांना पालिकेकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. नोटीस बजावल्यानंतरही जे थकीत मालमत्ता कर भरत नाहीत त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून मालमत्ता कर वसुली करण्यात येणार आहे.
महापालिकेने चालू आर्थिक वर्षात 24 मे 2024 पर्यंत टार्गेट असलेल्या 6200 कोटी रुपयांपैकी 1650 कोटी रुपये मालमत्ता करापोटी वसूल केले होते. त्यानंतर उरलेल्या 4550 कोटीपैकी आणखी 1372 कोटी रुपये मालमत्ता करापोटी वसूल केले आहेत. त्यामुळे एकूण 3022 कोटी रुपये मालमत्ता करापोटी वसूल केले आहेत. महापालिकेला 6200 कोटींचे टार्गेट गाठण्यासाठी आता आणखीन 3178 कोटी रुपये मालमत्ता करापोटी वसुली करण्याचे आव्हान पूर्ण करायचे आहे.
Edited By Komal Pawar Govalkar