घरमहाराष्ट्रBMC Budget 2022 : अर्थसंकल्पावर निवडणुकीची छाप; विकासकामांवर जोर देणार

BMC Budget 2022 : अर्थसंकल्पावर निवडणुकीची छाप; विकासकामांवर जोर देणार

Subscribe

मुंबई महापालिकेचा वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 45 हजार 949 कोटी 21 लाख रुपये एकूण आकारमान असलेला आणि 8.43 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांना मंगळवारी सादर केला.

मुंबई -: मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांच्या माध्यमातून यंदाचा जवळजवळ 46 हजार कोटी रुपयांचा फुगीर आकड्यांचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी मांडला आहे. त्यामध्ये भांडवली खर्चासाठी पालिकेच्या इतिहासात प्रथमच 22,646 कोटींची मोठी तरतूद करण्यात आलीय.

या अर्थसंकल्पात मुंबईकरांना दर्जेदार रस्ते, पदपथ, पूल, आरोग्य सुविधा, उद्याने, इलेक्ट्रिक बस सेवा, दर्जेदार शिक्षण, कोस्टल रोड, पूरस्थिती नियंत्रण, नद्यांचे पुनरुज्जीवन, रुग्णालये, दवाखाने यांची दरजोन्नती, विशेष मुलांसाठी सुविधा, कचरा व्यवस्थापन, कचरा व पाण्यापासून वीज निर्मिती, मंडई विकास, ऑक्सिजन प्लांट, शाळांची दुरुस्ती आदी मूलभूत नागरी सेवासुविधांवर भर देण्यात आलेला आहे. या अर्थसंकल्पाची पूर्व नियोजित अंमलबजावणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेली असल्याची पालिकेत चर्चा आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचा वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 45 हजार 949 कोटी 21 लाख रुपये एकूण आकारमान असलेला आणि 8.43 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांना मंगळवारी सादर केला. तत्पूर्वी मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा वर्ष 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 370 कोटी 24 लाख रुपये आकारमान असलेला अर्थसंकल्प सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला.

यामध्ये महसुली उत्पन्न 2870.24 कोटी रुपये, महसुली खर्च 2870.24 कोटी रुपये, तर भांडवली खर्च 500 कोटी रुपये दाखविण्यात आलेला आहे. गतवर्षीचा अर्थसंकल्प 39 हजार 38 कोटी 83 लाख रुपयांचा होता, त्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 6 हजार 910 कोटी 38 लाख रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा सन 2022- 23 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 370 कोटी 24 लाख रुपये आकारमान असलेला अर्थसंकल्प सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला.

- Advertisement -

यात महसुली उत्पन्न 2870.24 कोटी रुपये, महसुली खर्च 2870.24 कोटी रुपये, तर भांडवली खर्च 500 कोटी रुपये दाखविण्यात आलेला आहे. मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून पाय रोवून बसलेल्या ‘कोविड’मुळे मुंबई महापालिकेच्या हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोविड नियंत्रणासाठी पालिकेचे गेल्या दोन वर्षात तब्बल 5 हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत. तर यंदाच्या अर्थसंकल्पात एका वर्षासाठी 6 हजार 933 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली. यातून पालिका रुग्णालये, दवाखाने यांचा विकास करून तेथे दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.

उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना, अनधिकृत बांधकामांवर दंडात्मक कारवाई

कोविडमुळे मुंबई महापालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झालेत. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी पालिका आता अनधिकृत बांधकामांवर दंडात्मक कारवाईचा बडगा जोमाने उगारणार आहे. अनधिकृत बांधकामांचा उपग्रह, जीआयएस मॅपिंगद्वारे शोध घेऊन दोन पट दंड वसूल करून पालिकेची तिजोरी भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, कचरा निर्माण करणाऱ्यांकडून ‘वापरकर्ता शुल्क’पोटी 174 कोटींची वसुली तर ओला कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण करणाऱ्या हॉटेल चालकांकडून 26 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.

जकात बंद झाल्याने जीएसटी हप्त्यापोटी राज्य शासनाकडून पालिकेला वर्षभरात 11 हजार 429 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मालमत्ता करातून पालिकेला जानेवारी 2022 पर्यंत 13 हजार 543 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झालेय. यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून 7 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. विकास नियोजन शुल्कातून 3 हजार 950 कोटी रुपये, विविध बँकांतील मुदत ठेवींवरील व्याजपोटी 1 हजार 128 कोटी रुपये, जल व मलनि:सारण आकारातून 1 हजार 596 कोटी रुपये, राज्य शासनाकडून अनुदानापोटी 1 हजार 126 कोटी रुपये, पर्यावरण आकारातून 1 हजार 390 कोटी रुपये, इतर उत्पन्न माध्यमातून 3 हजार 121 कोटी रुपये, असे एकूण 30 हजार 743 कोटी 61 लाख रुपये उत्पन्न पालिकेला अपेक्षित आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -