घरताज्या घडामोडीBMC Budget 2022 : मुंबईत कर्करोगावर अद्ययावत उपचार प्रोटॉन थेरपी, आरोग्य केंद्र...

BMC Budget 2022 : मुंबईत कर्करोगावर अद्ययावत उपचार प्रोटॉन थेरपी, आरोग्य केंद्र घराशेजारी सुविधेची योजना

Subscribe

आरोग्य केंद्रांमध्ये १३९ विविध प्रकारच्या चाचण्या तसेच क्ष-किरण चाचणी, सी.टी. स्कॅन, मॅमोग्राफी इत्यादी चिकित्सा नाममात्र शुल्कावर उपलब्ध करुन देण्यात येतील. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून विविध चिकित्सा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खासगी सहभाग घेण्यात येईल.

मुंबई महानगरपालिकेचे अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहे. अर्थसंकल्पात आरोग्य विभागावर मोठी तरतूद करण्यात आली आहे. मुंबईकरांना जलद उपचार आणि अद्ययावत उपचार प्रणाली मिळण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. मुंबईत कर्करोगावर उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण येत असतात. तसेच मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांना अद्ययावत उपचार पद्धत प्रोटॉन थेरपीची सुविधा देम्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्र आपल्या घरा शेजारी या सुविधेची योजना महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. मुंबईतील रुग्णालयांमधील सुविधा वाढवण्यावर मुंबई महानगरपालिका भर देत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये कर्करोगावरील उपलब्ध अद्ययावत उपचार प्रणालीपैकी एक प्रोटॉन थेरपी या सुविधेची उभारणी टाटा कर्करोग रुग्णालय यांच्या सहकार्यानि मुंबईमध्ये उभारण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेने अलिकडेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध तंत्रज्ञांसाठी विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि वैद्यकीय पदवीधरांसाठी प्रगत वैद्यकीय कौशल्यांसाठी पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप्स हे अभ्यासक्रम अंतर्भूत केले आहेत. २०२१ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी अभ्यासाच्या जागा ५५० वरुन ८०० वर टाकली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा ५४५ वरुन ६८३ तर अतिविशेषकृत विभागांच्या जागा ९७ वरुन ११४ इतक्या वाढविण्यात आल्या आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र

महापालिकेनं नागरिकांना घराशेजारी प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करण्याची योजना केली आहे. यामुळे प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयावरील प्राथमिक उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचा भार कमी होईल व त्यांना गंभीर आजाराने बाधित रुग्णावरील उपचारासाठी अधिक लक्ष देणे शक्य होईल. महानगरपालिका कार्यक्षेत्रात पहिल्या टप्प्यात एकूण १०० आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येईल. या केंद्रामध्ये प्रतिक्षालय, डॉक्टर्स, औषधालय, परिचारिका कक्ष व रुग्ण तपासणी कक्ष यांचा समावेश असेल.

- Advertisement -

आरोग्य केंद्रांमध्ये १३९ विविध प्रकारच्या चाचण्या तसेच क्ष-किरण चाचणी, सी.टी. स्कॅन, मॅमोग्राफी इत्यादी चिकित्सा नाममात्र शुल्कावर उपलब्ध करुन देण्यात येतील. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून विविध चिकित्सा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खासगी सहभाग घेण्यात येईल. या केंद्रावर टेलिमेडिसिन मार्फत केईएम, सायन, नायर व कूपर रुग्णालय येथील विशेष व अतिविशेष डॉक्टरांचे सल्ले उपलब्ध होतील व तसेच मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयरोग इत्यादी आजारांचे तपासणी कार्यक्रम राबविण्यात येतील.

दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त १०० आरोग्य केंद्रांची स्थापना

या उपक्रमासाठी २०२२ आर्थिक वर्षात भांडवली खर्चासाठी एकूण ₹२५० कोटी व महसूली खर्चासाठी ₹१५० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

नवीन सुरु होणारे प्रकल्प

१) नायर रुग्णालय येथील ऑन्कोलॉजी विभागाची इमारत, Lincar Accelerator आणि PET

२) भांडुप येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय

3) डॉ. आंबेडकर रुग्णालय कंदिवली (प.) येथील सुपर स्पेशालिटी विभाग, पीएम सेंटर, धर्मशाळा आणि कर्मचारी व आरपी निवासस्थानांची इमारती हे नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत.

रुग्णालयांचा पुनर्विकास

१) सिध्दार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास

२) लो. टि.म.स. रुग्णालयाचा दुसऱ्या टप्यातील पुनर्विकास

३) क्रांतिवीर महात्मा ज्योतिक फुले रुग्णालयाचा पुनर्विकास

४) ओशिवरा प्रसुतीगृह

५) राजावाडी रुग्णालयाच्या अत्यावश्यक विभागाची इमारत

६) कामाठीपुरा येथील नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचे योजिले आहे.

लो. टि.म.स. रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण होण्याचा कालावधी ५ वर्षांचा असून तो ३ वर्षात पूर्ण करण्याचे अपेक्षित कोविड महामारीच्या परिस्थितीत देखील कूपर रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे नवीन बांधकामही नियोजित वेळेपूर्वी पूर्ण होईल. २०२१-२२ च्या सुधारीत अर्थसंकल्पात ११०२.३८ कोटी आणि २०२२-२६ अर्थसंकल्पीय अंदाजात २६६०.५६ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.


हेही वाचा : BMC Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्प 45,949.21 कोटींचा; गतवर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 17 टक्के वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -