Corona Vaccination : मुंबई महापालिकेकडून १५ ते १८ वयोगटातील १ लाख मुलांचे लसीकरण

Not implementing old retirement plan future of 50,000 employees hangs in the balance

मुंबई महापालिकेतर्फे १५ ते १८ वर्षे वयोगटातील १ लाख ८ हजार ३८० मुलांचे लसीकरण।करण्यात आले आहे.
लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी पालिका लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार असून लवकरच शाळा-कॉलेजमध्येसुद्धा लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे.

मुंबईत कोविडचा संसर्ग अद्यापही आहे. त्यात ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकाराची भर पडल्याने काही दिवसांपूर्वी बाधित रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली होती. सुदैवाने पालिकेने तातडीने उपाययोजना, जनजागृती आदी बाबींचा अवलंब केल्याने गेल्या २ – ३ दिवसांत रुग्ण संख्येत बऱ्यापैकी घट होऊ लागली आहे.

मुंबई महापालिकेने कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला परतावून लावल्यावर तिसरी लाटही धडकली आहे. मात्र पालिकेने सतर्कता बाळगत पूर्व तयारी अगोदरपासून केल्याने रुग्ण संख्या सध्या नितंत्रणात येत आहे.
पालिकेने, १५ ते १८ या वयोगटातील ९ लाख मुलांना लस देण्यासाठी ३ जानेवारीपासून मोहीम हाती घेतली. १२ जानेवारीपर्यंत १ लाख ८ हजार ३८० मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.


हेही वाचा : UP Election 2022: सपा आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाला कुठून संधी?