घरताज्या घडामोडीअध्यात्माचे राजकारण आज अख्या महाराष्ट्राने पाहिले; अमोल मिटकरींची भाजपावर टीका

अध्यात्माचे राजकारण आज अख्या महाराष्ट्राने पाहिले; अमोल मिटकरींची भाजपावर टीका

Subscribe

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. मात्र पुरस्कार सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अमित शाह व भाजपावर टीका केली आहे.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रधान करण्यात आला. मात्र पुरस्कार सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अमित शाह व भाजपावर टीका केली आहे. ‘मुंबई मनपाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण कसे करता येते हे आज भाजपने दाखवून दिले’, अशा शब्दांत अमोल मिटकरींनी टीका केली आहे. (BMC Election 2023 NCP MLA Amol Mitkari Slams BJP Amit Shah)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला आहे. “मुंबई मनपाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण कसे करता येते हे आज भाजपने दाखवून दिले. शहांसमोर मुंबईत शक्ती प्रदर्शन केले गेले. मात्र सभेतील गर्दी अराजकीय व श्रीसद्गुरु परिवारातील होती. अध्यात्माचे राजकारण आज अख्या महाराष्ट्राने पाहिले”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

- Advertisement -

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघरमध्ये भव्य सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यापीठावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी (Devendra Fadnvis) उपस्थित होते.


हेही वाचा – अंत:करणामध्ये सुविचार ठेवून त्या अनुरूप प्रत्येकाला वर्तन करता यायला हवे – आप्पासाहेब धर्माधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -