घर महाराष्ट्र BMC Election: भाजपला 60 च्या आत ऑलआऊट करू; राऊतांचा दावा

BMC Election: भाजपला 60 च्या आत ऑलआऊट करू; राऊतांचा दावा

Subscribe

भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मिशन 150 राबवलं आहे. त्यासंदर्भात दादरमधील वसंत स्मृतीमध्ये भाजपची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. भाजपचं 150 जर का टार्गेट असेल तर त्यांना 60 च्या आत ऑलआऊट करणार असल्याचा, दावा राऊतांनी केला आहे.

भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मिशन 150 राबवलं आहे. त्यासंदर्भात दादरमधील वसंत स्मृतीमध्ये भाजपची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. भाजपचं 150 जर का टार्गेट असेल तर त्यांना 60 च्या आत ऑलआऊट करणार असल्याचा, दावा राऊतांनी केला आहे. ( BMC Election BJP will be all out within 60 Sanjay Raut s claim )

संजय राऊत यांनी 19 खासदार निवडून आणणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर आता राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राऊत म्हणाले की आमचे 2019 च्या लोकसभेत 19 खासदार होते, 18 महाराष्ट्रात आणि 1 राज्याबाहेर. माझं इतकचं म्हणणं आहे की आमचा 19 चा आकडा कायम राहिलं, कदाचित वाढलेही. जो आकडा आमचा लोकसभेत आहे तो आम्ही कोणत्याही पद्धतीने कायम ठेवू आणि त्यात कोणालाही त्रास व्हायचं कारण नाही, असं म्हणत राऊतांनी नाना पटोलेंना सुनावलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला का घाबरता

- Advertisement -

संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला भाजप का घाबरत आहे? असा सवाल केला आहे. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवत आहात? भाजपने मुंबई निवडणुकांसाठी ठेवलेलं मिशन 150 च्या टार्गेटवरही राऊतांनी यावेळी भाष्य केलं. भाजपला आम्ही 60च्या आता ऑलआऊट करु, असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केलाय. कर्नाटकातही हे 200 जागा जिंकणार होते. त्यासाठी दिल्लीची संपूर्ण फौज मैदानात उतरवली. पण काही फायदा झालीा नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.

किरेन रिजिजू यांना कायदा मंत्री पदावरुन का हटवलं? 3

किरने रिजिजू यांना कायदा मंत्री पदावरुन का हटवण्यात आलं आधी ते सांगा. नाहीतर मी भविष्यात सांगेन. केंद्रीय कायदा मंत्री किरने रिजिजू यांना कोणत्या कारणासाठी कायदा मंत्री पदावरुन हटवण्यात आलं याचं भाजपने उत्तर द्यावं. कायद्याचा देशात सुरु असलेला गैरवापर, न्यायव्यवस्थांवर आणलेला दबाव म्हणून हे घडलं का, याचा खुलासा करा, असं राऊतांनी म्हटलं आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -