घरताज्या घडामोडीपालिकेच्या नर्सिंग विभागाचे अधीक्षिका पद 12 वर्षापासून रिक्त 

पालिकेच्या नर्सिंग विभागाचे अधीक्षिका पद 12 वर्षापासून रिक्त 

Subscribe
महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांपैकी एक म्हणजे नर्सिंग विभाग या विभागाचे प्रमुख सेवा सुश्रुषा अधीक्षिकाऱ्याचे पद गेल्या 12 वर्षापासून रिक्त आहे. याठिकाणी पात्र उमेदवार असूनही त्यांची पदोन्नती केली जात नाही यामुळे संबंधित विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे.
सदर पदावर काम करण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवार पालिकेच्या केईएम, सायन, नायर रुग्णालयात काम करीत आहेत . सध्या पैकी एक श्रीमती प्रतिभा नाईक या प्रभारी सेवा सुश्रुषा अधीक्षिका म्हणून काम पाहत आहेत. त्यांचे शिक्षण एम एस सी तसेच दोन वर्ष प्रिन्सिपल म्हणून केईएम रुग्णालय नर्सिंग येथे काम केलेले आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर पदावर एमपीएससी शैक्षणिक अर्हतेने उमेदवार आणण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे समजते.  मुंबई महापालिकेच्या एकंदरीत रुग्णालय प्रशासनाच्या या अनुभवाचा विचार करता सदर पद पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे. आणि सदर पद एमपीएससी तर्फे भरण्यास  मुन्सिपल मजदूर युनियन संघटनेचा विरोध आहे.
महापालिका रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका सर्वांगातून पदोन्नती घेतलेल्या वरून आले व नर्सिंग कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांमधून  या पदावर पदोन्नती देण्यात यावी अशीही मागणी संघटनेच्या वतीने केली आहे. त्याचप्रमाणे याच नर्सिंग विभागांमध्ये पाच प्राध्यापक व पाच उप प्राध्यापक ही पदे रिक्त आहेत. सन 2015 ला उप अधीक्षिका अशी तीन पदे निर्माण केली होती. परंतु ती अद्याप भरलेले नाहीत यामुळे नर्सिंग  कामांवर याचा परिणाम होत असल्याचे नर्सिंग विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -