घरताज्या घडामोडीशाळा सुरू करण्यासाठी महापालिका सज्ज, पालिका शाळांमध्ये दोन दिवसांत सॅनिटायझर फवारणी

शाळा सुरू करण्यासाठी महापालिका सज्ज, पालिका शाळांमध्ये दोन दिवसांत सॅनिटायझर फवारणी

Subscribe

शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय...

मुंबई : राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसले तरी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत १,१५९ शाळांच्या सुमारे ५०० इमारतीमध्ये सॅनिटायझर फवारणी व शाळा स्वच्छता करण्यात येणार आहेत.

तसेच, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार असल्याने विद्यार्थ्यांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. तसेच, हात धुण्यासाठी साबण आणि गेटवर स्क्रिंनगची व्यवस्थाही केली जाणार आहे. शाळेत सामाजिक अंतर राखण्यात येणार आहे. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

- Advertisement -

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत कोरोना नियंत्रणात आल्याने राज्याचतील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी तर शहर भागात इयत्ता ८ वी ते १२ वीच्या शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र आता कोरोनाबाबतची सध्याची स्थिती व रुग्ण संख्या आदी बाबी पाहता इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -