घरताज्या घडामोडीस्वच्छ समुद्रकिनारा मोहिमेची उद्या सांगता, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाची माहिती

स्वच्छ समुद्रकिनारा मोहिमेची उद्या सांगता, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाची माहिती

Subscribe

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने मुंबईत ५ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या ७५ दिवसांच्या ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर / स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र’ मोहीमेची १७ सप्टेंबर रोजी सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष स्वच्छता अभियानाद्वारे सांगता होणार आहे. यासंदर्भातील माहिती महापालिका घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या ७,५०० किलो मीटर लांबीच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत देशभारातील ७५ समुद्र किना-यांवर ७५ दिवसांची ही मोहीम राबविण्यात आली. मुंबईच्या स्वच्छतेसाठी दिवस-रात्र कार्यरत असणा-या आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील देशभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आपला खारीचा वाटा उचलला.

- Advertisement -

महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई-मनोरी या ७ प्रमुख चौपाट्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत वेगवेगळ्या संस्था, स्वयंसेवक, विविध वयोगटातील नागरिकांचे गट, शाळा – महाविद्यालयांमधील विद्यार्थी यांनी २५ टनांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा गोळा केला. या कच-याचे पुनर्वर्गीकरण करुन २ टनांपेक्षा जास्त कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला.

- Advertisement -

१७ सप्टेंबर २०२२ रोजी समुद्र किना-यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम सकाळी ६ ते ११ या कालावधीत पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समुद्र किना-यांची स्व्च्छता, गुणवंत कर्मचारी – संस्था यांना प्रशस्तीपत्र वितरण, कौतुक सोहळा, उपस्थितीतांचे आभार अशा विविध बाबींचा समावेश असणार आहे, असेही डॉ. हसनाळे यांनी यानिमित्ताने आवर्जून नमूद केले आहे.


हेही वाचा : मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले; रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -