घरताज्या घडामोडीPM Narendra Modi : मोदींच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यात पालिकेकडून कोट्यवधींचा खर्च

PM Narendra Modi : मोदींच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यात पालिकेकडून कोट्यवधींचा खर्च

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते मुंबईत (Mumbai) अनेक विकास कामांचं उद्धाटन (Inauguration ceremony) करण्यात आलं. या विकास कामांवरती मुंबई महापालिकेकडून (BMC) कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi Tour)आले होते. त्यावेळी पालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे झालेल्या या कार्यक्रमावर मुंबई महापालिकेने एका दिवसात तब्बल आठ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. या खर्चाला मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून कार्योत्तर मंजुरी मिळाली आहे.

पालिकेकडून कोट्यवधींचा खर्च

बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात मोदी यांच्या उपस्थितीत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेतील २० दवाखान्यांचे लोकार्पण, सात मलजल प्रक्रिया केंद्रं, महापालिकेच्या ३ रुग्णालयांच्या इमारती आणि ४०० किमीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा शुभारंभही मोदींच्या उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisement -

व्यवस्थापन करण्यासाठी एजन्सीकडून किती?

या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी एजन्सीकडून अंदाजित १० कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च सादर केला. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर एजन्सीकडून मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागाला अहवाल सादर करण्यात आला. या कामाचा तपशीलवार वस्तू आणि सेवा करासहित खर्च हा ८ कोटी ३३ लाख ५९ हजार ८५१ रुपये असल्याचे समोर आले आहे.

निवडक खर्च काय?

कार्यक्रमात काही निवडक खर्च देखील करण्यात आले. व्हीआयपींच्या सोफ्यासाठी ३२ लाख ५९ हजार २७५ रुपयांचा खर्च करण्यात आला. तर लाकडी मंच रेड कार्पेटसह ३१ लाख ८३ हजार, ढोल, ताशा, तुतारीसाठी २ लाख ९६ हजार २९८, रांगाळी, ध्वनीक्षेपक व्यवस्थेसह थेट प्रक्षेपणासाठी देखील लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 10 फेब्रुवारीचा मुंबई दौरा नेमका कसा असेल? जाणून घ्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -