घरताज्या घडामोडीमुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणं कठीण, महापालिकेच्या जल अभियंता खात्याची खंत

मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणं कठीण, महापालिकेच्या जल अभियंता खात्याची खंत

Subscribe

मुंबई : मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे वचन सत्ताधारी शिवसेना पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीत दिले होते. महापालिका जल अभियंता खात्याने घाटकोपर, मुलुंड भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग केला होता. मात्र पालिका जल अभियंता खात्याने, मुंबईतील डोंगराळ भागातील झोपडपट्टीत पाणी पोहोचविणे अडचणीचे ठरत असून वाढीव पाणीसाठा नसल्याने मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे.

त्याचप्रमाणे, मुंबई महापालिकेकडून मुंबईला दररोज होणारा पाणीपुरवठा हा ३,८५० दशलक्ष लिटर इतका आहे. तर मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता मुंबईला दररोज किमान ४,५०० ते ५,००० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे नव्हे ती मुंबईची गरज आहे. मात्र सध्या होत असलेल्या ३,८५० दशलक्ष लिटर पाण्यापैकी २७ टक्के पाणी चोरी व गळती यापोटी वाया जाते.

- Advertisement -

ही पाणी गळती व पाणी चोरी रोखली तरच मुंबईला आवश्यक पाणी पुरवठा करण्यात मोठी मदत होणार आहे. त्यामुळे दररोज होत असलेला पाणीपुरवठा वास्तविक, आणखीन २७ टक्केने कमीच आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान व इतर कामांसाठी असलेली पाण्याची गरज भागात नाही. त्यातच, मुंबईसाठी भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या गारगाई, पिंजाळ व दमणगंगा या तीन पैकी एकही नवीन पाणीप्रकल्प पालिकेने उभारलेला नाही.

२०१४ ला मागील काही वर्षात फक्त मध्य वैतरणा हा नवीन तलाव मुंबई महापालिकेला केंद्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात यश आले. त्यातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे हे नवीन पाणीप्रकल्प मार्गी लावल्याशिवाय आणि पाणी साठ्यात आणखीन वाढ केल्याशिवाय वाढीव पाणीसाठा उपलब्ध होणार नाही. जोपर्यंत अधिक पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे.
तसेच, मुंबईत कुर्ला, भांडुप, कांजूरमार्ग, पवई, घाटकोपर, विक्रोळी पार्क साईट, मालाड आदी भागात डोंगराळ, टेकडी भाग असून या ठिकाणी झोपडपट्टी परिसरात खालील भागातून पंपाने पाणी चढवावे लागते.

- Advertisement -

त्यासाठी पाण्याची साठवण करण्यात येणाऱ्या जलाशयाची ( पाण्याची टाकी) पातळी नीटपणे ठेवावी लागते. ही पाणी पातळी कमी असेल तर पाणी डोंगराळ भागात पोहोचविणे अवघड होते. त्यामुळे ही सर्व कारणे पाहता मुंबईला जोपर्यंत वाढीव व मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणे कठीण आहे.


हेही वाचा : ‘या’ मेळाव्याच्या तिपटीने आम्ही दसरा मेळावा घेऊ आणि.., दीपक केसरकरांचं मोठं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -