सहा महिन्यांत शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, नेमकं काय आहे कारण?

shirdi new guidelines released for shirdi sai baba devotees on state government night curfew

नाशिक – शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांत दोनवेळा विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्याने शिर्डी साईबाबा संस्थान मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तसंच, येत्या दोन महिन्यांत नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे अशी सूचनाही औरंगाबाद खंडपीठाने केल्या आहेत.

सहा महिन्यापूर्वीच शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. मात्र, संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार हे विश्वस्त मंडळ नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. नियमबाह्य मंडळ स्थापन केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. त्यामुळे हे मंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. याप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून खंडपीठात सुनावणी सुरू होती. अखेर, याबाबत आज निर्णज जाहीर झाला असून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.

हेही वाचा – शिर्डीत हार-फुलं आणि प्रसादाचा वाद शिगेला, विक्रेते आक्रमक; आंदोलनाचा इशारा

दोन महिन्यांत विश्वस्त मंडळ नेमा

औरंगाबाद खंडपीठाने मंडळ बरखास्तीचे आदेश देताच पुढच्या दोन महिन्यांत नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्यभरातून या विश्वस्त मंडळात सभासद नेमण्यात येतात. या विश्वस्त मंडळात एकूण १६ लोकांची निवड करण्यात येते. त्यामुळे आता पुढच्या निवडीसाठी साईबाबा संस्थानसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – शिर्डीच्या साईबाबांचरणी ४० लाखांचा सुवर्ण मुकूट दान

साईबाबा मंदिराभोवती वादाचा फेरा

कोरोना काळात सुरक्षेच्या कारणास्तव साईबाबा मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता कोरोना संसर्ग कमी झालेला असतानाही मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिरात भाविकांना हार फुले घेऊन जाण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक व्यापारांकडून करण्यात येत होती. यासाठी स्थानिक व्यापारांसह समाजसेवकांनी मंदिरात परिसरात मोठे आंदोलन छेडले होते. याप्रकरणी मंदिर प्रशासनाने एका महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.