घरमहाराष्ट्रपाथर्डीत बोगस डॉक्टर गजाआड, मोठा औषध साठा जप्त

पाथर्डीत बोगस डॉक्टर गजाआड, मोठा औषध साठा जप्त

Subscribe

पाथर्डी तालुक्यातील टप्पा पिंपळगाव येथे कोणत्याही प्रकारची पदवी अथवा परवानगी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. बोगस डॉक्टर शोध समितीने ही कारवाई केली आहे. कारवाईच्या वेळी पथकाने या ठिकाणी औषधे, इंजेक्शनचा साठा व अन्य साहित्य देखील जप्त केले. संजय बिस्वास असे पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

पाथर्डी तालुक्यातील टप्पा पिंपळगावमध्ये बिस्वास हा डॉक्टर म्हणून काम करत एका क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करीत होता. त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा परवानगी नसल्याची माहिती बोगस डॉक्टर शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पाथर्डी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्रा बांगर, डॉ. अमोल दहिफळे, सतीश शिरसाठ आदींनी बिस्वासच्या क्लिनिकवर छापा मारण्याची कारवाई केली. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर औषधे व इंजेक्शनचा साठा असल्याचे आढळून आले. कारवाई करणाऱ्या पथकाने औषधे व अन्य साहित्य जप्त करून संजय बिस्वास याला फौजदारी कारवाईसाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisement -

त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा परवानगी नसल्याची माहिती बोगस डॉक्टर शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पाथर्डी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्रा बांगर, डॉ. अमोल दहिफळे, सतीश शिरसाठ आदींनी बिस्वासच्या क्लिनिकवर छापा मारण्याची कारवाई केली. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर औषधे व इंजेक्शनचा साठा असल्याचे आढळून आले. कारवाई करणाऱ्या पथकाने औषधे व अन्य साहित्य जप्त करून संजय बिस्वास याला फौजदारी कारवाईसाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आतापर्यंत 5 बोगस डॉक्टर गजाआड

बोगस डॉक्टर शोध पथकाच्या माध्यमातून मागील तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 5 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर चांगलेच धास्तावले असून बहुतांश बोगस डॉक्टर तालुक्यातून सध्यातरी गायब झाल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -