घरCORONA UPDATEअवघ्या तीन तासांत बनले डॉक्टर; MCIM चा अजब कारभार

अवघ्या तीन तासांत बनले डॉक्टर; MCIM चा अजब कारभार

Subscribe

डॉक्टर होण्यासाठी पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच अनुभवाचीही आवश्यकता असते. पण कोरोनाविरोधातील लढ्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (एमसीआयएम) दिलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणातून अवघ्या तीन तासांत डॉक्टर होता येत होते. या संधीचा फायदा घेत राज्यातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसह अल्टरनेटीव्ह मेडिसिनच्या सदस्यांनीही ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी होऊन नावासमोर ‘डॉक्टर’ उल्लेख असलेले प्रमाणपत्र अवघ्या तीन तासांत मिळवले. त्यामुळे पाच वर्ष शिक्षण घेऊन डॉक्टर होणाऱ्या तरुणांनी एमसीआयएमच्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

हे वाचा – Coronavirus: धक्कादायक; कोरोना विरोधातील लढ्यात बोगस डॉक्टरांची एंट्री

- Advertisement -

कोरोनाच्या सामन्यासाठी आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर सज्ज असावेत यासाठी एमसीआयएमकडून त्यांच्या नोंदणीकृत डॉक्टर आणि आंतरवासिता प्रशिक्षणार्थींसाठी http://www.mcimtraining.com या संकेतस्थळामार्फत ९ ते ११ एप्रिलदरम्यान ऑनलाईन प्रशिक्षण व परीक्षा देण्याची व्यवस्था केली होती. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीसाठी परिषदेच्या संकेतस्थळावर नऊ व्हिडीओ दिले होते. हे सर्व व्हिडीओ २.३० तासांचे आहेत. त्याचबरोबर या संकेतस्थळावर हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये कोव्हीड मार्गदर्शक पुस्तिका, आयुष मार्गदर्शिका आणि कोव्हीड योद्धा यांची माहिती देणाऱ्या पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच अर्ध्या तासांची ऑनलाईन परीक्षा ठेवण्यात आली होती. ही ऑनलाईन परीक्षा कोणालाही देता येत असल्याने तीन दिवसांत ६० हजारांपेक्षा अधिक जणांनी ही परीक्षा देत परिषदेचे डॉक्टरकीचे प्रमाणपत्र मिळवले. यामध्ये परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचारी, समाजसेवक यासह अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांचाही सहभाग आहे. अल्टरनेटीव्ह मेडिकल डॉक्टर असोसिएशनचे सदस्य असलेल्या विनोद जाधव या व्यक्तीकडे असोसिएशनने घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असण्याबरोबरच एमसीआयएमच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही असल्याचे पुरावेही ‘आपलं महानगर’च्या हाती आले आहेत.

mcim vinod jadhav
अल्टरनेटिव्ह मेडिकल सर्टिफिकेट

राज्यातील चार वैद्यकीय परिषदांकडे नोंदणीकृत असणारे वैद्यकीय व्यवसायिकच अधिकृत समजण्यात येतात, असे असताना अल्टरनेटिव्ह मेडिकल सिस्टीमच्या नावाने काहीनी मान्यता नसलेल्या विषयांच्या खासगी संस्थाचे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. दहावी व बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर अल्टरनेटीव्ह अभ्यासक्रम कारणारे आणि ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांच्या हाताखाली काम करून शिकलेल्यांचा समावेश अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांमध्ये होतो. वाशीम येथील अलटरनेटिव्ह मेडिसीन डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र या संस्थेने त्यांचा ७०० ते ८०० सदस्यांसाठी ‘कोव्हिड १९’चे प्रमाणपत्र ५०० रुपयांत वितरित केले. याच लोकांनी नंतर एमसीआयएमचे तीन तासांत ऑनलाइन प्रशिक्षण व परीक्षा देत प्रमाणपत्र मिळवून अधिकृत डॉक्टर होण्याचा पराक्रम केला आहे. ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्याने नागरिकांना अल्टरनेटीव्ह मेडिसिनच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागते. त्यांना आता अधिकृत परिषदेचे डॉक्टरकीचे प्रमाणपत्र मिळाल्याने आपला गोरस धंदा चालवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -
mcim vinod jadhav original
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे ऑनलाईन प्रशिक्षण सर्टिफिकेट

 

मी अल्टरनेटीव्ह मेडिसिन डॉक्टर असोसिएशन या संघटनेशी संलग्न आहे. त्याचप्रमाणे मी नुकतेच महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी होऊन प्रमाणपत्रही घेतले आहे. या प्रशिक्षणाचा मला भरपूर फायदा झाला आहे. – विनोद जाधव, सभासद, अल्टरनेटीव्ह मेडिसिन डॉक्टर असोसिएशन

 

एमसीआयएमतर्फे आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांसाठी त्यांच्या पोर्टलवर प्रशिक्षण ठेवले होते. पण त्यांनी एक चूक केली. तुम्ही डॉक्टरच नाहीत तर एमसीआयएमच्या पोर्टलवर तुमची नोंदणी होता कामा नये. पण पोर्टलवर कोणीही नोंदणी करून परीक्षा देऊन पास होऊ लागला आणि ते प्रमाणपत्र सोशल मीडियावर टाकू लागला. त्यामध्ये इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या लोक जास्त सहभागी झाले. पण हि बाब एमसीआयमच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोर्टल बंद केले. – माधव हिवाळे, अध्यक्ष, अल्टरनेटीव्ह मेडिसिन डॉक्टर असोसिएशन

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -