घरमहाराष्ट्रवापी एमआयडीसीत कंपनीच्या बॉयलरमध्ये मोठा स्फोट

वापी एमआयडीसीत कंपनीच्या बॉयलरमध्ये मोठा स्फोट

Subscribe

तसंच वापी आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे कर्मचारी देखील घनास्थळी पोहचले आहेत. कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. या स्फोटामध्ये अद्याप कोणतिही जीवितहानी झाली नाही.

वापीमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला आहे. वापी औदयोगिक कार्यक्षेतत्रातील अॅपेक्स फार्मा कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाला आहे. महाराष्ट्रात सीमेवरील वलसाड येथे ही घटना घडली आहे. स्फोटानंतर गॅस गळती होऊ लागली आहे. बॉयलरच्या स्फोटामुळे परिसरामध्ये धूराचे साम्राज्य आहे. गॅस परिसरामध्ये पसरल्यामुळे याठिकाणच्या नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे तर डोळ्यामध्ये जळजळ होत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. तसंच वापी आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे कर्मचारी देखील घनास्थळी पोहचले आहेत. कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. या स्फोटामध्ये अद्याप कोणतिही जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

या आधी अशा घडल्या होत्या घटना

गेल्या काही दिवसांमध्ये कंपनीमध्ये स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस एन्टरप्रायजेस या केमिकल कंपनीत २०१६ मध्ये स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये ५ कर्मचारी ठार, तर ९४ जण जखमी झाले होते. ८ ऑगस्ट २०१८ रोजी चेंबूरच्या माहुल येथे बीपीसीएल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये ४५ जण जखमी झाले होते. या स्फोटामुळे आसपासच्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान २९ ऑक्टोबर २०१८ ला तळोजा एमआयडीसीमध्ये एका कंपनीला अचानक आग लागून भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २ दोन जण जखमी झाले होते तर या स्फोटाने परिसर हादरला होता. या अशा घटनांमुळे पर्यावरण प्रेमींना अशा प्रकारच्या केमिकल कंपन्यांना विरोध केला आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; २ जण जखमी

चेंबूरमध्ये बीपीसीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट; ४५ जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -