अभिनेता आमीर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका; ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या आई झीनत खान यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने झीनत खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या आई झीनत खान यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने झीनत खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (bollywood actor aamir khans mother suffered heart attack admitted to breach candy hospital)

आमिर खानची झीनत खान गेल्या काही दिवसांपासून पाचगणी येथील घरी राहत होत्या. त्या पाचगणी येथील घरी त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजते. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.

झीनत खान यांना सध्या मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याबद्दल आमिर किंवा त्याच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मिळाळेल्या माहितीनुसार झीनत यांनी उपचारांना प्रतिसाद दिल्यानं त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

काही महिन्यांपूर्वी झीनत यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हाही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा – इराकच्या फुटबॉल स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट; 10 जणांचा मृत्यू, 20 जखमी