घरCORONA UPDATECoronavirus : बॉलिवूड निर्माता करीम मोरानीची दुसरी मुलगीही कोरोनाबाधित!

Coronavirus : बॉलिवूड निर्माता करीम मोरानीची दुसरी मुलगीही कोरोनाबाधित!

Subscribe

प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि शाहरुख खानचा निकटवर्ती करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे.

६ एप्रिलला रोजी बॉलिवूडला आणखी दोन झटके बसले आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि शाहरुख खानचा निकटवर्ती करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. त्याआधी करीम मोरानीच्या शजा मोरानी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यांनतर त्याची दुसरी मुलगी अभिनेत्री झोया मोरानीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाची लक्षणं आढळल्यावर दुसरी मुलगी आणि अभिनेत्री झोया मोरानीला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झोयाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आयसोलेशन आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. शजा मोरानी नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. “शजा मार्चच्या सुरुवातीला श्रीलंकेहून परतली होती. तर झोया मार्च महिन्याच्या मध्यात राजस्थानहून परतली होती. माझ्या दोन्ही मुलींनी या संदर्भात अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिली होती,” असे करीम मोरानी यांनी सांगितले.

- Advertisement -

विशेष म्हणजे करीम मोरानीच्या दोन्ही मुलींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु झोयाचा अहवाल निगेटिव्ह आला. तर शजा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यानंतर रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी तिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. “शजामध्ये आठवडाभर कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसली नाहीत, ती पूर्णत: बरी होती. पण मोठी मुलगी झोयामध्ये कोरोनाची लक्षणं होती, तरीही तिचा अहवाल निगेटिव्ह आला. तिची पुन्हा तपासणी केली. सध्या दोघीही आयसोलेशन आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत,” असं करीम मोरानीने सांगितलं.

करीम मोरानी यांची इमारत सील

करीम मोरानीचं कुटुंब ज्या इमारतीत राहते ती सील करण्यात आली आहे. जवळपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या परिसरात करीम मोरानीचं कुटुंब राहते, तिथे अनेक कलाकार राहतात. कोरोना व्हायरसची लागण झालेली झोया ही बॉलिवूडमधील तिसरी व्यक्ती आहे. याआधी तिची बहिण शजा मोरानी आणि बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

अनेक वेब सीरिजमध्ये झोया मोरानीचं केले काम

अभिनेता शाहरुख खानने झोया मोरानीला २०११ मध्ये आलेल्या ‘ऑल्वेज कभी कभी’ चित्रपटातून लॉन्च केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत अली फजल आणि सत्यजीत दुबे मुख्य भूमिकेत होते. ‘भूतपूर्व’ या वेब सीरिजमध्ये ती शेवटची झळकली होती. याशिवाय तिने मस्तान, भाग जॉनी भाग, अखूरी यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. झोया मोरानी ‘ओम शांती ओम’ आणि ‘हल्ला बोल’ या चित्रपटांची असिस्टंट डायरेक्टर देखील होती.

 

कोरोनाची लागण झालेली बॉलिवूडमधील कनिका कपूर पहिली व्यक्ती

गायिका कनिका कपूर ही बॉलिवूडमधील पहिली व्यक्ती होती. जी कोरोना पॉझिटिव्ह होती. कनिका कपूर होळीच्या आधी लंडनहून मुंबईला परतली होती. यानंतर ती लखनौला गेली आणि तिथे अनेक लोकांसोबत पार्टीही केली. तब्येत बिघडल्यानंतर तिने तपासणी केली असता, COVID-19 पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या सगळेच दहशतीत होते. कनिका कपूरच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणामुळे उत्तर प्रदेशात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -