घरमहाराष्ट्रवर्ध्यातील सैन्यदलाच्या जागेवर स्फोट; ६ जणांचा मृत्यू, ११ जखमी

वर्ध्यातील सैन्यदलाच्या जागेवर स्फोट; ६ जणांचा मृत्यू, ११ जखमी

Subscribe

स्फोटके निकामी करताच स्फोट झाल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना वर्धा येथे घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे सैन्यदलाला शस्त्रसाठा पुरवणाऱ्या केंद्रावर आज सकाळी जुनी स्फोटके निकामी करतेवेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वर्धातील लष्करी कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे आजुबाजूच्या गावांमध्ये मात्र काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

अफवांवर विश्वास ठेऊ नका

या घटस्थळापासून सोनेगाव फुलगाव डेपो ५० मीटरच्या अंतरावर होता. या घटनेनंतर डेपोला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे  अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या डेपोला यापूर्वी आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र स्फोट झाल्यामुळे या डेपोलाही आग लागण्याच्या अफवा उठवल्या गेल्या. अशा कोणत्याही अफवा पसरु नये यासाठी लोकांना आणि प्रसारमाध्यमानां या परिसरापासून दूर ठेवण्यात येत आहे.

वर्धातील लष्करी तळावर स्फोट घडला आहे. सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी बोललो. ६ लोकांचा मृत्यू तर ११ जण जखमी आहेत. मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्य सरकारच्यावतीने मदत करु – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -