घरमहाराष्ट्रपुणे रेल्वे स्थानकावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू, वस्तू स्फोटक...

पुणे रेल्वे स्थानकावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू, वस्तू स्फोटक…

Subscribe

पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तासाभराने रेल्वे स्टेशनवरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू स्टेशनबाहेरच्या परिसरात नेण्यात आली. बॉम्ब शोधक नाशक पथकाने वस्तूची तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त काय म्हणाले –

- Advertisement -

बॉम्बसदृश वस्तू आढळल्यावर रेल्वे पोलिसांनी लगेच प्रवाशांना स्थानक रिकामे करण्याची सूचना दिली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर जाण्यासाठी सध्या कोणालाही परवानगी नाही. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रेल्वे स्थानकात दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली. आज सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू जिलेटीन नसल्याचं समोर आलं आहे. पुढील तपास करत आहोत. पॅनिक होण्याची गरज नाही, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले.

काय घडले – 

- Advertisement -

पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले होते. बॉम्ब शोधक नाशक पथक रेल्वे स्थानकात दाखल झाले असून संबंधित वस्तूची तपासणी केली गेली. दरम्यान पुणे स्टेशनवर येणाऱ्या गाड्यांना यार्डमध्ये थांबवण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दिसत आहे. परिसरात तणावाचे वातावरण होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -