घरताज्या घडामोडीपुण्यात बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने खळबळ

पुण्यात बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने खळबळ

Subscribe

पिंपरी - चिंचवडमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळ्याची घटना उघडकीस आली असून या सर्व वस्तू भंगार विक्रेत्यांनी आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी – चिंचवडमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. दरम्यान, लोखंडाच्या बॉम्ब सदृश वस्चू असल्याचे निदर्शनास आले असून ते रस्त्याच्या कडेला सापडल्या होत्या. मात्र, याचा कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडच्या वेताळ वस्ती भागातील रस्त्यावर बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याची माहिती कंट्रोल रुमला देण्यात आली. त्यानुसार चिंचवड पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु तपासानंतर त्याठिकाणी चार लोखंडी अवजड बॉम्ब सदृश आढळल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परंतु, या बॉम्ब सदृश वस्तूचा धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

भंगार विक्रेत्याने वस्तू आणल्या असाव्यात

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या सर्व वस्तू भंगार विक्रेत्याने लष्कराच्या भागातून आणल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच अशा प्रकारच्या वस्तू रस्त्यावर टाकणे चुकीचे आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या घटनेचा शोध घेऊन संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -