घरताज्या घडामोडीमेसेज डिलीट करणे हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार, न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

मेसेज डिलीट करणे हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार, न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Subscribe

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ग्रुपमधील एका सदस्याने मेसेज करणाऱ्याविरोधात पोलिसांना तक्रार दिली होती.

सोशल मीडियावर केलेली पोस्ट डिलीट करणे हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. नागपूर जिल्ह्यातील जफर अली शेर अली सैय्यद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निरीक्षण नोंदवले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यावर गुन्हा दाखल झाल्यास ती पोस्ट डिलीट करणं हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. बऱ्याचदा आपण समोरच्याला मेसेज करतो आणि नंतर डिलीट करत असतो. परंतु असे करुन आपल्या बोलल्याचा पुरावा नष्ट करत असतो असे न्यायालयाने सुनाणीदरम्यान म्हटलं आहे.

सोशल मीडियावर एखाच्या धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट करुन समाजात तेढ निर्माण करणं हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यातील पोस्ट डिलीट केल्यास तो पुरावा नष्ट करण्याचा प्रकार केल्यास गुन्हा रद्द करता येत नाही. पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा होऊ शकतो. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण दिले आहे की, जर मेसेज डिलीट केला तर तो पुरावा नष्ट करण्याचा प्रकार आहे. यामुळे अशा प्रकरणात गुन्हा रद्द करता येणार नाही.

- Advertisement -

प्रकरण काय?

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ग्रुपमधील एका सदस्याने मेसेज करणाऱ्याविरोधात पोलिसांना तक्रार दिली होती. यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली. २०१९ मध्ये आरोपीने दुर्गा उत्सवादरम्यान आपल्या परिसरातील लोकांचा व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप तयार केला होता. याच ग्रुपवर एका सदस्याने धार्मावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमुळे भावना दुखावल्याने दुसऱ्या सदस्याने पोलिसांना तक्रार दिली होती. या तक्रारीवर न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी उच्च न्यायालयाने मेसेज डिलीट केल्यास पुरावा नष्ट करण्याचा प्रकार असल्याचे सांगत दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे.


हेही वाचा :  iPhone 13 लाईनअपमध्ये काय आहे खास? वाचा वैशिष्ट्ये

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -