घरमहाराष्ट्र७० व्या वर्षी पोलीस अधिकाऱ्याला लाच घेतल्याची शिक्षा; १७ वर्षांनी हायकोर्टात दोषी

७० व्या वर्षी पोलीस अधिकाऱ्याला लाच घेतल्याची शिक्षा; १७ वर्षांनी हायकोर्टात दोषी

Subscribe

न्या. एस. एम. मोडक यांनी हा निकाल दिला. काटकर यांचे वय ७० आहे. त्यामुळे या निकालाला दहा आठवड्यांची स्थगिती द्यावी, अशी मागणी adv आनंद पाटील यांनी केली. याला सरकारी वकील एच. जे. देढीया यांनी विरोध केला.  मात्र न्यायालयाने या निकालाला दहा आठवड्यांची स्थगिती दिली. मात्र दंडाच्या रक्कमेला स्थगिती देण्यात आलेली नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

 

मुंबईः कोल्हापूर येथील निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ ज्ञानदेव काटकर यांना लाच घेतल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. काटकर यांचे वय ७० वर्षे आहे. सन २००६ मध्ये काटकर यांना लाच घेताना अटक झाली होती. सुमारे १७ वर्षांनी उच्च न्यायालयाने त्यांना दोषी धरले आहे.

- Advertisement -

न्या. एस. एम. मोडक यांनी हा निकाल दिला. काटकर यांचे वय ७० आहे. त्यामुळे या निकालाला दहा आठवड्यांची स्थगिती द्यावी, अशी मागणी adv आनंद पाटील यांनी केली. याला सरकारी वकील एच. जे. देढीया यांनी विरोध केला.  न्यायालयाने या निकालाला दहा आठवड्यांची स्थगिती दिली. दंडाच्या रक्कमेला स्थगिती देण्यात आलेली नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

कोल्हापूर विशेष सत्र न्यायालयाने १३ जुलै २०१६ रोजी काटकर यांना निर्दोष सोडल्याचा निकाल दिला. या निकालाविरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. मोडक यांच्यासमोर यावर या याचिकेवर सुनावणी झाली.

- Advertisement -

तक्रारदारांनी २००६ मध्ये त्यावेळचे सीआयडीचे उप अधिक्षक चौगुले व सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदार यांच्याविरोधात भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याचा गुन्हा होता. त्यांना अटक झाली व नंतर जामीनावर सुटका झाली. त्यानंतर याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.  तक्रारदारांचे दागिने न्यायालयाच्या ताब्यात होते. ते परवत मिळवण्यासाठी तक्रादारांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यासंदर्भात सहकार्य मिळावे यासाठी तक्रारदार चौगुले यांच्याकडे गेले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर यांची भेट घेण्यास त्यांना सांगितले. सहाय्यक निरीक्षक काटकर यांच्याद्वारे तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यास तक्रारदारांनी नकार दिला. दागिने परत मिळवण्यासाठी त्यांनी केलेला अर्जही स्थानिक न्यायालयने फेटाळला.

ऑक्टोबर २००६ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार करण्यात आली. ही तक्रार नेमकी कोणत्या तारखेला करण्यात आली यावरुन मतभेद होता. त्यानंतर सापळा रचून सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विशेष न्यायालयाने तक्रारदार यांचा दावा फेटळून लावला. तक्रारदारांविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार समोर आलेला नाही. तो का समोर आला नाही याचा खुलासा सरकारी पक्षाने केलेला नाही. तसेच उप अधिक्षक चौगुले यांच्याविरोधातही तक्रार होती. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर यांच्याविरोधातच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असा ठपका स्थानिक न्यायालयाने ठेवला व काटकर यांची निर्दोष सुटका केली.

न्या. मोडक यांनी कोल्हापूर न्यायालयाचा निकालच रद्द केला. केवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार कधी दाखल झाली यात तफावत असेल तर त्यावर संशय घेतला जाऊ शकत नाही. आमच्यासमोर काटकर आहेत. त्यांनी लाच मागितल्याचा पुरावा आहे. त्यामुळे त्यांना किमान सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली जात आहे, असे न्या. मोडक यांनी स्पष्ट केले.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -