घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशविसर्जन, मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

पुण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशविसर्जन, मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

Subscribe

पुणे – शहरातील 5 मानाच्या गणपतींविरोधात न्यायालयात दाखल याचिका निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचा 1ला मान कायम राहीला आहे. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींविरोधात बधई समाज ट्रस्टने याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली असून लक्ष्मी रोडवरून प्रथम 5 मानाच्या गणपतींची विसर्जण मिरवणूक सुरू होण्याच्या प्रथेविरोधात आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

न्यायालयाचा निकाल काय ? –

- Advertisement -

या याचिकेत अन्य याचिकाकर्ते नसल्याने याचा विस्तृत विचार करून सरसकट आदेश देता येणार नाही. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिवणुकीला अमुक तासच लागतील वगैरे मुद्देही गृहीत धरता येणार नाहीत, असे आदेश न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लद्धा यांच्या खंडपीठाने दिले.

याचिकेत काय होते –

- Advertisement -

मानाच्या गणेश मंडळांआधी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढायची असल्यास पोलिसांनी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामध्ये पुणे पोलिस आयुक्तांसह मानाच्या 5 गणेश मंडळांना प्रतिवादी करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे हा वाद निकाली निघाला आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत मानाची पाच गणेश मंडळे मार्गस्थ झाल्यानंतरच इतर मंडळांनी जावे, हा परंपरा आणि प्रथेचा भाग असून, तसा कायदा नाही. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वी लहान गणेश मंडळांच्या लक्ष्मी रस्त्याच्या वापरावरील बंधने बेकायदा आहेत. त्यामुळे कलम १९ नुसार मिळालेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन होत, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -