Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नवाब मलिक खरंच आजारी आहेत का?; उच्च न्यायालयाने मागितला खुलासा

नवाब मलिक खरंच आजारी आहेत का?; उच्च न्यायालयाने मागितला खुलासा

Subscribe

नवाब मलिक यांनी जामीनासाठी याचिका केली आहे. या याचिकेवर न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. नवाब मलिक यांनी उपचाराचे कारण देत जामीन मागितला आहे. मात्र ते खरंच आजारी आहेत का? हे आधी पटवून द्या, तरच त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होईल. अन्यथा जामीनासाठी इतरही बऱ्याच याचिका प्रलंबित आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबईः मनी लॉंड्रींग प्रतिबंधक कायद्यातंर्गत (पीएमएलए) अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक खरंच आजारी आहेत का?, असा सवाल करत उच्च न्यायालयाने याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी जामीनासाठी याचिका केली आहे. या याचिकेवर न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. नवाब मलिक यांनी उपचाराचे कारण देत जामीन मागितला आहे. मात्र ते खरंच आजारी आहेत का? हे आधी पटवून द्या, तरच त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होईल. अन्यथा जामीनासाठी इतरही बऱ्याच याचिका प्रलंबित आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पीएमएलए कलम ४५ अंतर्गत जामीन मंजूर करण्याची तरतुद आहे. त्यासाठी काही अटी आहेत. एक तर अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद केली गेली असेल. दुसरं म्हणजे आरोपीचे वय १६ वर्षांपेक्षा कमी असेल. आरोपी महिला आहे किंवा आरोपी आजारी आहे. या कारणांसाठी जामीन दिला जातो. त्यामुळे जामीनासाठी याचिका करणाऱ्या प्रत्येक आरोपीला तो आजारी असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले जाते. त्यामुळे नवाब मलिक हे खरचं आजारी आहेत हे स्पष्ट व्हायला हवे, असे न्यायालयाने नमूद केले. याचा खुलासा करण्यासाठी वेळ देत न्यायालयाने ही सुनावणी २१ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

- Advertisement -

दाऊदची मालमत्ता कमी दरात विकत घेतल्याचा मलिक यांच्यावर आरोप आहे. या गुन्ह्यासाठी ईडीने मलिक यांना अटक केली आहे. मे २०२२ मध्ये ईडीने मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर मलिक यांनी जामीनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर मलिक यांंनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला.

मलिका यांना उपचारासाठी जामीन मंजूर करावा, अशी मागणी वरीष्ठ वकील अमित देसाई यांनी केली. याला केंद्र सरकारचे वकील अनिल सिंग यांनी विरोध केला. अखेर न्यायालयाने मलिक हे खरंच आजारी आहेत का याचा खुलासा करण्याचे आदेश दिले व ही सुनावणी एक आठवड्यासाठी तहकूब केली.

- Advertisment -