घरमहाराष्ट्रबेस्ट कर्मचार्‍यांसाठी खुशखबर 9100 रुपये मिळणार बोनस

बेस्ट कर्मचार्‍यांसाठी खुशखबर 9100 रुपये मिळणार बोनस

Subscribe

बेस्टच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्ट कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचा औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयावर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. हायकोर्टाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बेस्टच्या ठरावीक कर्मचार्‍यांना बोनस देऊन अन्य कर्मचार्‍यांवर अन्याय करता येणार नाही. सरसकट सर्वच कर्मचार्‍यांना बोनस द्या, असा आदेश बेस्ट प्रशासनाला दिला. त्यामुळे बेस्टच्या कर्मचार्‍यांना 9100 रूपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी बेस्टच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार्‍या कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. या निर्णयावर मान्यता प्राप्त बेस्ट कर्मचारी संघटनांनी विरोध केला होता. तसेच संपावर जाण्याची नोटीससुध्दा बेस्ट प्रशासनाला बजावली होती. इतकेच नव्हे तर या निर्णयाविरोधात कामगार संघटनांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. औद्योगिक न्यायालयाने सर्व कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय दिला. त्या विरोधात बेस्ट प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली.

- Advertisement -

या सुनावनीत दोन्ही पक्षाचे मत जाणून घेतले. तसेच उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कामगारांना दिलासा देत सरसकट दिवाळी सानुग्रह अनुदान द्यावे, असा आदेश बेस्ट प्रशासनाला दिला.त्यामुळे बेस्टच्या सर्वच कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. हा 9100 रुपयांंच्या अनूदान असनार आहे. मात्र दिवाळीची सुट्टी आल्यामुळे काही काळ या कर्मचार्‍यांच्या बोनसला उशीर होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -