घरट्रेंडिंगकोकणासाठी रेल्वेच्या ७८ विशेष गाड्यांचे बुकींग आजपासून सुरू, असे आहे वेळापत्रक

कोकणासाठी रेल्वेच्या ७८ विशेष गाड्यांचे बुकींग आजपासून सुरू, असे आहे वेळापत्रक

Subscribe

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष अशा ७८ गाड्यांसाठी बुकींगची सुविधा आजपासून सुरू केली आहे.

उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात जाताय ? या आहेत उन्हाळी विशेष गाड्या. या गाड्यांच्या बुकींगला सुरूवात आजपासूनच झाली आहे. त्यामुळे तुमच तिकिट नक्कीच बुक करा. मध्य रेल्वेने उन्हाळी सुटीसाठी विशेष अशा ७८ गाड्यांची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल या ठिकाणाहून या गाड्या चालवण्यात येणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या)

81047 ही विशेष गाडी ही लोकमान्य टर्मिनस येथून 20.45 वाजता प्रत्येक शुक्रवारी सुटेल. ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीसाठी गाडी उपलब्ध असणार आहे. या कालावधीत १० फेऱ्या होणाऱ्या होणार आहोत. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमाळी येथे पोहचेल.

- Advertisement -

०१०४८ ही गाडी प्रत्येक रविवारी ११ वाजता सुटेल तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२ वाजून १२ वाजता ही गाडी पोहचेल.
——————–

पनवेल – करमाळी विशेष (२० फेऱ्या)

८१०४९ ही गाडी प्रत्येक शनिवारी रात्री ९ वाजता पनवेलहून सुटेल. येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. ६ जूनपर्यंत ही विशेष गाडी सुरू राहणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमाळी येथे पोहचेल. या कालावधीत या गाडीच्या १० फेऱ्या होणार आहेत.
तर ०१०५० ही विशेष गाडी करमाळी येथून १०.४० वाजता शनिवारी सुटेल. या कालावधीत दहा फेऱ्या होतील.
—————
लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी (१८ फेऱ्या)

०१०४५ ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १.१० वाजता प्रत्येक शुक्रवारी सुटेल. तर त्याच दिवशी रात्री १२.२० वाजता ही गाडी करमाळी येथे पोहचेल. १० एप्रिल ते ५ जून या गाडीच्या ९ फेऱ्या होणार आहेत. १० एप्रिल ते ५ जून दरम्यान या गाडीच्या ९ फेऱ्या होतील
०१०४६ ही विशेष गाडी रात्री १२.५० वाजता प्रत्येक शुक्रवारी करमाळी येथून सुटेल. तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ही गाडी पोहचेल.

- Advertisement -

——————
लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या)

०१०३७ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी प्रत्येक सोमवारी सुटेल. ४ एप्रिल ते ८ जून या कालावधीत या विशेष गाडीच्या फेऱ्या होतील. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी येथे पोहचेल.

०१०३८ ही विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी प्रत्येक सोमवारी सुटेल तर रात्री १२ वाजून २० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहचेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -