Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

धक्कादायक! भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Subscribe

मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली केलेल्या अमानुष मारहाणीत 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात असलेल्या इरळी गावातील मुलासोबत सदर घटना घडली.

मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली केलेल्या अमानुष मारहाणीत 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात असलेल्या इरळी गावातील मुलासोबत सदर घटना घडली. आर्यन दीपक लांडगे असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कर्नाटकात असलेल्या एका मांत्रिकाने ही मारहाण केल्याने असा दुर्दैवी प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे. ( Boy dies after being beaten by a Mantrik)

हेही वाचा – झारखंडमध्ये एका महिलेने दिला पाच बाळांना जन्म

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आर्यनला सतत ताप येत होता. परंतु तो यामधून बरा होत नव्हता. त्यामुळे आर्यनला त्याच्या एका नातेवाईक महिलेने कर्नाटकातील कुडची येथे असलेल्या शिरगूर गावातील एका मांत्रिकाकडे उपचारासाठी नेले. त्यावेळी त्या मांत्रिकाने त्याला भूतबाधा झाली असल्याचे सांगितले. यानंतर यावर उपचार करण्यासाठी त्या मांत्रिकाकडून मुलाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याला गंभीर इजा झाली. ज्यानंतर त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून कवठेमहांकाळ अंनिसचे कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावांतील त्या कुटुंबातील नातेवाईकांची या प्रकरणी भेट घेतली. तर या प्रकरणी मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यास कुटुंबाला तयार केले. मांत्रिकाच्या अमानुष मारहाणीमुळे आर्यनचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे केली आहे. त्यांनी तत्काळ मुलांच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करुन घेत गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

सदर गुन्हा कुडची पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असल्याने हा गुन्हा कुडची पोलीस स्टेशनला वर्ग करणार असल्याचे कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षकांकडून सांगिण्यात आले आहे. पण आजच्या विज्ञान युगात किरकोळ आजारासाठी मांत्रिकाकडे जाणे हे अज्ञानपणाचे लक्षण आहे. मांत्रिकाच्या अघोरी कृत्यामुळे अशा घटना घडतात तेव्हा मांत्रिकाच्या पासून सावध रहावे असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात यांच्याकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -