राधिका आपटेच्या न्यूड फोटोवर नेटकरी संतापले, #BoycottRadhikaApte सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये

लीना यादव दिग्दर्शित 'पार्चेड' या सिनेमातील राधिकाचा हा न्यूड फोटो असून तो फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे

BoycottRadhikaApte trend on social media radhika's nude photo viral
राधिका आपटेच्या न्यूड फोटोवर नेटकरी संतापले, #BoycottRadhikaApte सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये

अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) नेहमीच तिच्या हटके स्टॉइल आणि अभिनयामुळे चर्चेत असते. आजवर राधिकाच्या अनेक दर्जेदार भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळाल्या आहेत. राधिका आपटे सध्या सोशल मीडियावर ट्रोल झालीय. राधिकाच्या एका न्यूड फोटोमुळे ती चर्चेत आलीय तिचा न्यूड फोटो पाहून नेटकरी चांगलेच संतापल्याचे पहायला मिळत आहे. #BoycottRadhikaApte असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. लीना यादव दिग्दर्शित ‘पार्चेड’ या सिनेमातील राधिकाचा हा न्यूड फोटो असून तो फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा करत राधिकाने भारतीय संस्कृती खराब केल्याचा आरोप करण्यात आलाय.  (BoycottRadhikaApte trend on social media radhika’s nude photo viral )

राधिकाच्या फोटोवर अनेक आक्षेपार्ह कमेंट नेटकऱ्यांकडून करण्यात आल्यात. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या राज कुंद्रा प्रकरणाशी देखील राधिकाच्या या फोटोचा संबंध लावण्यात आला आहे. बॉलिवूड भारतीय संस्कृतीचा नाश करत आहे अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी राधिकावर निशाणा साधला आहे.

राधिकाने शेअर केला या न्यूड फोटोचा अनुभव 

२०१६ साली शुट करण्यात आलेल्या पार्चेड या सिनेमातील राधिका हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या सिनेमात राधिकासोबत आदिल हुसैन या अभिनेत्याने काम केले होते. या दोघांमध्ये एक न्यूड सीन शुट झाला होता. या सिनेमातील हा न्यूड सीन शुट करतानाचा राधिकाचा अनुभव तिने एका मुलाखतीत शेअर केला होता. राधिका म्हणाली होती, हा सीन सीन करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी त्यावेळी माझ्या बॉडी इमेजशी झगडत होते. न्यूड होऊन स्क्रिनवर दिसणे काही सोपे नव्हते. मला माझ्या शरीराचा आणि आकाराचा अभिमान आहे. या सिनेमाला नंतर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे माझे कौतुक झाले आणि मला कामे मिळत गेली, असे राधिकाने म्हटले होते.


हेही वाचा – ‘ती परत आलीये’ म्हणत अनेक वर्षांनी अभिनेते विजय कदम प्रेक्षकांच्या भेटीला