घरमहाराष्ट्रकुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा? पोटनिवडणुकीत पुण्यात बॅनरबाजी

कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा? पोटनिवडणुकीत पुण्यात बॅनरबाजी

Subscribe

पुणे : राज्यातील पाच जिल्ह्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच झाले. ही निवडणुक मविआसह सत्ताधारी भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. पण या निवडणुकीत मविआने तीन जागांवर विजय मिळत भाजपला मोठा धक्का दिला, भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवण्यात यशं आलं. अशात आता भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुक होणार आहे. या निवडणुकांसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज भरला. मात्र या उमेदवारीवर स्थानिक ब्राम्हण समाज नाराज असल्याची चर्चा रंगतेय. हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी जाहीरपणे ही नाराजी व्यक्त करत याचा किती फटका बसेल, ते येत्या २-३ तारखेला कळेल, असा इशारा दिला, याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बॅनर्स आता मोठ्या चर्चेचा विषय ठरतोय.

पुण्यातील चौका- चौकात हे बॅनर्स झळकत आहे. मात्र हे बॅनर्स नेमके कोणी लावले याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण बॅनर्सवर ‘कसब्यातील एक जाहरूक मतदार’ असं ठळक अक्षरात नमूद केलं आहे. पण या बॅनर्स आणि त्या बॅनर्सवरील मजकुरामुळे पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण या बॅनर्सवर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड आणि आता कसबा या दोन मतदारसंघातील भाजप उमेदवारीचा उल्लेख आहे. कुलकर्णींचा मतदार संघ गेला..टिळकांचा मतदारसंघ गेला..आता नंबर बापटांचा का??? समाज कुठवर सहन करणार? असा प्रश्न या बॅनरमधून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

पुण्यात कोथरुडमधील स्थानिक उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र मागील निवडणुकीत पाटील निवडून आले पण मेधा कुलकर्णींचे 1 लाखांचे मताधिक्य पाटलांसाठी 20 हजारांवर आलं होतं. त्यानंतर आता कसबा मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे त्या ठिकाणी भाजपने हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली. मात्र या उमेदवारीवरून ब्राह्मण समाज नाराज असल्याची भूमिका आनंद दवे यांनी मांडली आहे.

यावर आनंद दवे म्हणाले की, गेल्या वेळी कोथरुडमधून मेधा कुलकर्णी बाद झाल्य आहेत. आता टिळक बाद झालेत. त्यामुळे 21 आमदारांपैकी एकही आमदार ब्राह्मण समाजाची बाजू घेईल असा नाही. ब्राह्मण समाजावर जेव्हा आरोप होतात, त्यावेळी ठामपणे उत्तर देणारा प्रतिनिधी त्या भागात असला पाहिजे, असं आमचं मत आहे. उद्या वेगळ्या समाजावर अन्याय झाला असता तरी आमची हीच भूमिका असती. चिंचवडला जो न्याय दिला गेला तोच न्याय टिळक घराण्यालाही दिला पाहिजे होता, असही आनंद दवे म्हणाले.

- Advertisement -

ब्राह्मण समाजात खदखद आहे. भाजपाचे लोक सोशल मीडियावरही जाहीरपणे लिहित आहेत की, हे कुठेतरी चुकतयं. त्यांची नाराजी मतदारसंघात कशी दिसेल, याचं चित्र २- ३ तारखेला भाजपाच्या लोकांना दिसले, असा दावाही आनंद दवे यांनी केला आहे.


कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी लढणार निवडणूक, पुण्यात मविआविरुद्ध भाजप 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -