घरमहाराष्ट्रपुणेब्राह्मण समाज नोटाला मत देणार?; कसबा पोटनिवडणुकीला वेगळे वळण

ब्राह्मण समाज नोटाला मत देणार?; कसबा पोटनिवडणुकीला वेगळे वळण

Subscribe

हेमंत रासन यांच्या उमेदवारीमुळे ब्राम्हण समाज नाराज झाला आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. भाजपने रासन यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज ब्राम्हण समाजातील काही नागरिकांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली. या भेटीनंतर ब्राम्हण समाजाने वरील धमकीवजा इशारा दिला. 

पुणेः कसबा पेठ पोटनिवडणुकीवरुन राजकीय घमासान सुरु आहे. त्यात आता ब्राह्मण समाजानेही उडी घेतली आहे. आमची मते हवीत. मग आमचा उमेदवार का नको, असा पवित्रा घेत ब्राह्मण समाजाने स्वतःचा उमेदवार जाहिर करण्याचा धमकीवजा इशारा भाजपला दिला आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्या वर्षी निधन झाले. निवडणूक आयोगाने त्यांच्या जागी पोट निवडणूक जाहिर केली. ही पोट निवडणूक जाहिर झाल्यानंतर सत्ताधारी भाजप व महाविकास आघाडीने तयारी सुरु केली. ही पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह भाजपमधील नेत्यांनी धरला आहे. मात्र त्या आग्रहाला धुडकावत महाविकास आघडीने या पोट निवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्यासोबतच भाजपने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासन यांची उमेदवारी जाहिर केली.

- Advertisement -

हेमंत रासन यांच्या उमेदवारीमुळे ब्राह्मण समाज नाराज झाला आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. भाजपने रासन यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज ब्राह्मण समाजातील काही नागरिकांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली. या भेटीनंतर ब्राह्मण समाजाने वरील धमकीवजा इशारा दिला.

आजाराशी झुंज देत असतानाही मुक्ता टिळक यांनी भाजपसाठी योगदान दिले आहे. तरीही भाजपकडून त्यांच्या कुटुंबातील कोणालाच उमेदवारी देण्यात आली नाही. ब्राह्मण समाजातील उमेदवाराला डावलण्यात आल्याची भावना ब्राह्मण समाजामध्ये आहे. आमची एकगठ्ठा मते हवीत. मग आमचा उमेदवार का नको, याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे, अशी मागणी ब्राह्मण समाजाने केली आहे.

- Advertisement -

मात्र शैलेश टिळक यांनी आपण नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हेमंत रासने यांनी निवडणूक अर्ज भरण्याआधी निघालेल्या पदयात्रेत शैलेस टिळक सहभागी नव्हते झाले. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी नाराजीच्या वृत्ताचा नकार केला. ब्राह्मण समाज मतदान करेल, असेही शैलेश टिळक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -