ब्राह्मण महासंघाने नाकारली शरद पवार यांची भेट

This year, highest sugar production has taken place and there is an opportunity for export, said Sharad Pawar
यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक साखरेचे उत्पादन, विक्रमी साखर निर्यातीला संधी - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ब्राह्मण संघटनांना भेटीचे आमंत्रण दिले होते. यातील ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation) त्यांची भेट नाकारली आहे. हे आमंत्रण शनिवार संध्याकाळचे होते. आमदार अमोल मिटकरी यांनी लग्न लागताना होणारे मंत्रोच्चार आणि इतर विधीवरून वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतरच हा वाद निर्माण झाले आहे.

हेही वाचा – अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन

ब्राह्मण महासंघाची प्रतिक्रिया –

अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) विधानावर शरद पवार (Sharad Pawar) यांना हे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे असे कळवले होते. मात्र, त्यानंतर छगन भुजबळांनी शरद पवारांच्या उपस्थितीत ज्योतिष, पुरोहित हे धंदा करतात, असा शब्द वापरला होता. त्यांना यावर व्यावसाय हा शब्द वापरता आला असता. पण तो त्यानी वापरला नाही. त्यानंतर बोलताना पवारांनी अशीच काही उदाहरणे दिली. भुजबळ आणि मिटकरींच्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यामुळे त्यांसोबत बोलण्यासारखे काही उरले नाही, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली आहे.

हेही वाचा – अमोल मिटकरींच्या अडचणीत वाढ, पुण्यात तक्रार दाखल

मिटकरींचे स्पष्टीकरण –

ही सभा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये झाली होती. या सभेत कन्यादान या विषयावर अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) हे वक्तव्य केले होते. कन्या हा दान करण्याचा विषय नाही, असे त्यांनी म्हटले होते. यावर कन्यादानावेळीच्या मंत्रांचा अर्थ मी सांगितला होता, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. मी संस्कृतचा जाणकार आहे. अभ्यासक आहे. मला जर कोणते प्रश्न कळाले नाहीत, तर त्याची उत्तरे मी जाणकारांकडून समजून घेईन, असे स्पष्टीकरण मिटकरींनी दिले होते.

मिटकरी नेमके काय म्हणाले होते –

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील आयोजित पक्षाच्या परिवार संवाद मेळाव्यात व्यासपीठावरुन भाषण केल. यावेळी मिटकरी म्हणाले की, मी एका ठीकाणी गेलो होतो मुलीचा बाप म्हणाला साहेब बसा कन्यादान आहे. यावर मी म्हटलं अन्नदान ऐकलं, कन्यादान ऐकलं, रक्तदान ऐकलं, कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? नाही म्हणे असतो आम्हाला शिकवल आहे. तुम्ही बसा असे म्हटल्यावर मी खुर्चीवर बसलो.

नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली होती यांनतर लग्नाचे विधी सुरु झाले. लग्न लावणारे गुरुजी(ब्राम्हण) सांगतात डोळ्याला पाणी लावा, गुरुंजींच्या शैलीत मिटकरी पुढे सांगितले, तुमचा हात माझ्या हातात घ्या, आचमन करा, धुपम दिपम नमस्कारम, मम भार्या समर्पयामि असे मिटकरी म्हणाले. मी नवरदेवाच्या कानात सांगितले. अरे येड्या ते महाराज म्हणाले की, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा, आररर कधी सुधारणार आपण असे मिटकरी म्हणाले. मिटकरींच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.