घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीकडून आचारसंहितेचा भंग; तक्रार दाखल

राष्ट्रवादीकडून आचारसंहितेचा भंग; तक्रार दाखल

Subscribe

आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कांग्रेस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत.

राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा 25 मार्च रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील बी-4 या शासकिय निवासस्थानी माध्यमांसमोर प्रसिद्ध झाला होता. नियमांनुसार आचारसंहितेच्या काळात कोणत्याही जाहिरनाम्याच्या घोषणेसाठी शासकिय कार्यालय किंवा निवासस्थान यांचा वापर करणे गैरलागू आहे.

सदर प्रकरणाची चौकशी करुन याबाबत तक्रार नोंदवण्याचे निर्देश निवडणूक अधिका-यांनी ‘ए’ वॉर्डला दिले आहेत. त्यानुसार, मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशन येथे आचारसंहिता भंग प्रकरणी राष्ट्रवादी पक्षाविरोधात तक्रार दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

निवडणुक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी माध्यमांना आवाहन केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की दिनांक 25 मार्च रोजी सर्व माध्यम प्रतिनिधींनी दुपारी 3 वाजता धनंजय मुंडे यांच्या बी-4 या शासकीय निवास्थानी उपस्थित राहावे. ही बाब निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आल्याने निवडणुक आयोगाच्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -