घरताज्या घडामोडीBreak the Chain : बांधकाम साहित्यांशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

Break the Chain : बांधकाम साहित्यांशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

Subscribe

नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करणाऱ्या साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु

पावसाचा मोसम तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यात तौक्ते चक्रीवादळामुळे (cyclone tauktae) अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या त्याचप्रमाणे येणाऱ्या पावसाळ्यासाठी बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम साहित्यांशी संबंधित दुकाने आणि व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’ (Break the Chain) अंतर्गत लागू करण्यात आलेल्या आदेशांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित दुकाने आणि व्यवसायाचाही अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. (Break the Chain: Inclusion of construction materials shops in the essential category)

येणाऱ्या पावसाच्या मोसमासाठी लागणारे विविध साहित्य त्यासंबंधीचे व्यवसाय, छत्र्या,प्लॅस्टिक शिट्स, पावसाळी रेनकोट,पोशाख यासारख्या वस्तूंची विक्री करण्यासाठी किंवा त्या वस्तू दुरुस्त करणारी दुकाने व व्यवसाय सुरु राहणार आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करणाऱ्या साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु राहतील. बांधकाम व्यवसायाशी संबंधित दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास ही दुकाने अत्यावश्यक सेवेत देण्यात आलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु ठेवू शकतात,असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

बांधकाम साहित्यांशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला असला तरी सर्व दुकान आणि व्यवसायिकांना सर्व कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला किंवा संस्थेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. त्याचप्रमाणे कोरोना महामारित सरकारकडून पुढील सूचना येईपर्यंत दुकानदार किंवा व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवावी लागतील, असेही सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -