Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम Breaking : अनिल जयसिंघानीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, गुजरातहून ताब्यात

Breaking : अनिल जयसिंघानीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, गुजरातहून ताब्यात

Subscribe

Amruta Fadnavis Bribe Case | बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे.

Amruta Fadnavis Bribe Case |  मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. विविध गुन्ह्यांतून बाहेर काढण्याकरता एक कोटींची लाच ऑफर करण्यात आली होती, याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघांनी याला मुंबई पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे.

अनिक्षा जयसिंघानी या फॅशन डिझायनरने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधून त्यांच्याशी मैत्री केली होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत अनिक्षाने फडणवीस यांना विविध आमिषे दाखवली. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवले असल्याचे तिने सांगितले. यातून बाहेर काढण्याकरता तिने अमृता फडणवीसांना एक कोटींची ऑफर दिली होती. तसंच, अनिल जयसिंघानी यांना काही बुकी माहिती आहेत. या बुकींवर धाड टाकून पैसे कमावता येतील, असंही आमिष अनिक्षाने अमृता फडणवीस यांना दाखवलं होतं, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी अनिक्षाला आधीच ताब्यात घेतलं होतं. मात्र, अनिल जयसिंघानी फरार होता. परंतु, मुंबई पोलिसांनी आज गुजरातहून त्याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा ‘हाच’ तो प्रकार, फडणवीसांनी केला खुलासा

- Advertisement -

कोण आहे अनिल जयसिंघानी?

अनिल जयसिंघानी हा मुळचा उल्हासनगरचा असून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी आहे. २०१० साली त्याला छोटा बुकी म्हणून ओळखले जायचे. २०१० मध्ये बेट लावताना पंचतारांकित हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली होती. १९९५ मध्ये त्याने काँग्रेसमधून उल्हासनगर पालिकेतून निवडणूकही लढवली होती. १९९७ मध्ये पुन्हा निवडणूक लढवली. २०२२ मध्ये त्याने राष्ट्रवादीत प्रवेश करत पालिका निवडणुकीत विजय मिळवला. २०१४ मध्ये त्याने शिवसेनेतही प्रवेश केला होता. परंतु, गेल्या ९ वर्षांपासून तो फरार असून त्याच्याविरोधात जवळपास १५ गुन्ह्यांची नोंद आहे.

- Advertisment -