घरमहाराष्ट्रपुणेBreaking : डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी; ललित पाटील प्रकरण आलं अंगलट?

Breaking : डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी; ललित पाटील प्रकरण आलं अंगलट?

Subscribe

पुणे : ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी नाशिकच्या ललिट पाटीलला अटक केली आहे. नऊ महिने ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करी करत असल्याचा आरोप ललिट पाटीलवर आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांचे नाव समोर आले आहे. विरोधकांकडून याप्रकरणी सरकारला सातत्याने लक्ष केले जात असतानाच आता ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांना दणका देत त्यांची नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरण डॉ. संजीव ठाकूर यांच्या अंगाशी आल्याची सध्या चर्चा सुरू असली तरी हे प्रकरण वेगळे आहे. (Breaking Dr. Sanjeev Thakur was removed from the post of DN Lalit Patil case came to an end)

हेही वाचा – दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले शरद पवारांच्या भेटीमागचे ‘खरे’ कारण

- Advertisement -

ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची महाराष्ट्र मानसिक आराेग्य संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची जे.जे. रुग्णालयातील उपअधिष्ठाता पदावरून पदाेन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रूजू झाले हाेते. मात्र तीन वर्षांच्या आतच त्यांची 13 जानेवारी रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी डाॅ. संजीव ठाकूर यांना ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आले.

डाॅ. संजीव ठाकूर यापूर्वी ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत हाेते. मात्र या निर्णयाविरोधात काळे यांनी ‘महाराष्ट्र अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल’ने मॅटकडे दाद मागितली होती. मॅटने 14 जुलै रोजी डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, डॉ. संजीव ठाकूर यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत आज हायकोर्टाने चार महिन्यांनी निकाल देत डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करत त्यांना दणका दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने 2010 मधील ‘तो’ गुन्हा केला रद्द

डॉ. संजीव ठाकूर यांच्यामुळे ससून रुग्णालय चर्चेत

दरम्यान, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी चर्चेत आले आहेत. ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्याची डॉ. संजीव ठाकूर यांनी कारागृहाला पत्राद्वारे शिफारस केल्याचे समोर आले आहे. याशिवाय ललित पाटीलवर ठाकूर यांनी उपचार केले आहेत. याप्रकरणी ठाकूर यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता. त्यामुळे संजीव ठाकूर यांची बदली किंवा निलंबन होणार, हे स्पष्ट होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द केल्याचा निकाल दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -