Live Update: होळी आणि धुळवडीवरील निर्बंध शिथिल, राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी

Maharashtra Breaking News

Live Update: होळी आणि धुळवडीवरील निर्बंध शिथिल, राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी

राज्यात यंदाची होळी निर्बंधमुक्त


Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक, शरद पवार राहणार उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच इतर बडे नेते उपस्थित असतील.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच बैठक होत आहे. ही बैठक मुंबई वाय बी चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे.


हा विजय रथ थांबणार नाही, महाराष्ट्रात नक्की भाजपचा भगवा फडकेल – फडणवीस


‘मिशन जनता’ हेच आमचे एकमेव मिशन – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात २०२४ मध्ये भाजपचा भगवा फडकेल – देवेंद्र फडणवीस

Live Update: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल, रोड शोला सुरुवात

गोवा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर फडणीस पहिल्यांदा नागपुरात दाखल

नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून फडणवीसांचे स्वागत


देशात गेल्या २४ तासात २ हजार ५३९ कोरोनाबाधितांची नोंद

४४९१ रुग्णांची कोरोनावर मात तर ६० रुग्णांचा मृत्यू
देशात आतापर्यंत ५ लाख १६ हजार १३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू


गोवा विधानसभा निवडणुकीतील यशानंतर देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात रोड शो

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर

गोवा विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर रोड शो


होळी सणाच्या खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये गर्दी

होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फूलं खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये सकाळी मोठी गर्दी केली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी होळी साजरी करता आली नव्हती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जल्लोष करत होळी साजरी करताना दिसत आहेत.


राज्य सरकारची होळी आणि धूलिवंदनासाठी नियमावली….

रात्री दहाच्या आत होळी करणे बंधनकारक केले आहे.
डीजे लावण्यास सक्त मनाई केली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे लाऊड स्पीकर जोरात लावू नये.
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करू नये. असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धूलिवंदनाच्या दिवशी एखाद्याला जबरदस्तीने रंग लावू नये. तसेच पाण्याचे फुगे ही फोडू नये.
महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे.