स्तनपान सप्ताह : सुदृढ, निरोगी बाळासाठी स्तनपान आवश्यकच

आईचे दूध बाळासाठी नैसर्गिक पूर्णान्न असून स्तनपान हा बाळाचा हक्क आहे. त्यापासून बाळाला वंचित ठेवू नये व नवजात बाळास जन्मानंतर १ तासाच्या आत स्तनपानास सुरुवात करावी. विशेष म्हणजे चिकाचे दूध बाळास अवश्य द्यावे व बाळास पहिले ६ महिने वयापर्यंत निव्वळ स्तनपान म्हणजे केवळ आईचे दूध द्यावे. त्यानंतर पुरक आहार सुरू केल्यावरही २ वर्ष वयापर्यंत स्तनपान सुरुच ठेवावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे व माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी केले आहे.

आईचे दूध हे बाळासाठी पौष्टिक आहार असून आईचे दूध हे बाळासाठी जणू अमृतच असते. ९ महिने आपल्या गर्भात ठेवून, बाळाला जन्माला घालणार्‍या आईची तुलना कशासोबच होऊ शकत नाही. परंतु, बदलती जीवनशैली, शरीराला जपण्याची असलेली स्पर्धा, करिअर यामुळे काही माता बाळाला अंगावर पाजण्यासाठी उत्सुक नसतात. बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध हा पौष्टिक आहार असतो. त्यामुळे स्तनपान करून बाळाला सदृढ ठेवणे महत्त्वाचे आहे.नवजात बाळाला स्तनपान करणे ही एक आवश्यक बाब आहे. बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध अत्यंत गरजेचे व उपयुक्त असते. दुधात बाळाच्या रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी उपयोगी घटक असतात. म्हणूनच मातेचे दूध हे बाळासाठी संपूर्ण आहार मानला जातो. त्यामुळे बाळाचा विविध आजारांपासून बचाव होतो. आईचे दूध बाळासाठी अमृतच असल्याने एक तासाच्या आत स्तनपान करावे बाळाच्या पहिले सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान त्यानंतर पूरक आहार सुरू केल्यानंतरही दोन वर्षापर्यंत स्तनपान सुरू ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, आजही काही प्रमाणात चुकीच्या बाबी घडत आहेत. त्यात चिकाचे दूध फेकून देणे, बाळाला मधाचे बोट चाटवणे, बॉटलमधून दूध देणे, मिल्क फॉर्म्युला पावडरचा अधिक वापर करणे, या बाबी टाळणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

एका तासाच्या आत स्तनपान करावे

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळ जन्मल्यानंतर लवकरात लवकर मातेच्या व बाळाच्या त्वचेचा एकमेकांशी संपर्क करावा. एका तासाच्या आत स्तनपानास सुरुवात करावी. पहिल्या एका तासापासून त्याला आईचे दूध देणे आवश्यक ठरते. त्या चिक दुधातच रोगप्रतिकारशक्ती वाढण्याची क्षमता असते. त्यामुळे स्तनपान करावे.

मातेला फायदे

 • स्तन व ओव्हरीच्या कर्करोगाची जोखीम कमी होते
 • गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते
 • गर्भधारणा टळते
 • नैसर्गिकरित्या कुटुंब नियोजनास मदत होते.
 • दवाखान्याची गरज कमी होते.
 • कुपोषण कमी करण्यास मदत होते
 • पैशाची बचत होते.
 • बालमृत्यू टाळता येतात

 बाळाला फायदे

 • बाळाला संपूर्ण आहार
 • रोगप्रतिकारशक्त्ती निर्माण होते
 • जबड्याच्या विकासास मदत विकास
 • सहज पचन होते
 • शारीरिक व बौधिक