घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअखेर! लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे ३० लाख घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात

अखेर! लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे ३० लाख घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात

Subscribe

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडप्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाखांची लाच स्विकारताना जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय ५७) यांच्यासह त्यांचे साथीदार अ‍ॅड. शैलेश सुमतीलाल सभद्रा (वय३२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१५) अटक केली. या कारवाईत खरे यांच्या घरझडतीतून तब्बल १५ लाखांची रोकड तर, सुमारे ३३ लाखांचे २४ तोळे सोनेदेखील जप्त करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त राहिलेले आणि वारेमाप पैसे कमाविणारे सतीश खरे यांच्या रुपाने मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागला आहे.

सतीश खरे हे नाशिक जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. शैलेश सुमातीलाल सभद्रा हे वकील आहेत. तक्रारदार नाशिक जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संचालकपदी कायदेशीर पद्धतीने व वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्या निवडीविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावर जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी सुरु आहे. ती सुनावणी तक्रारदारांच्या बाजूने लावून निर्णय देण्यासाठी जिल्हा निबंधक सतीश खरे व खासगी व्यक्ती अ‍ॅड. शैलेश सभद्रा यांनी सोमवारी (दि.१५) तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची मागणी केली.

- Advertisement -

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. सतीश खरे यांच्या राहत्या घरी तक्रारदाराकडून ३० लाख रुपयांची लाच स्विकारताना पथकाने खरे व वकील सभद्रा यांना अटक केली. दोघांविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -