घरमहाराष्ट्रलग्नात फोटो काढणे वधूच्या आईला पडले महागात

लग्नात फोटो काढणे वधूच्या आईला पडले महागात

Subscribe

फोटो काढायचा असल्याने नववधूच्या आईने दागिने ठेवलेली पर्स शेजारील बाकड्यावर ठेवली याचाच फायदा घेत चोरट्याने ८ लाखांचे दागिने ठेवलेल्या पर्सवर डल्ला मारला.

पिंपरी-चिंचवड परिसरातील कासारवाडी येथे नव वधुच्या आईला विवाह समारंभात फोटो काढणे चांगलेच महागात पडले आहे. या फोटोमुळे आठ लाखांचे सोन्याचे दागिने चोराने लंपास केले आहेत. कासारवाडी येथे बुधवारी पूजा आणि पंकज यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. तेव्हा नव वधु पूजा आणि वर पंकज यांचे सोन्याचे दागिने पूजाची आई छाया यांच्याकडे दिले होते. दागिने त्यांनी पर्समध्ये ठेवले आणि पर्स बाजूला ठेऊन त्या फोटो काढायला गेल्या. आजूबाजूला कोणी नसल्याची संधी पाहून चोराने पर्सवर डल्ला मारला. यात तब्बल आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाखोचे दागिने लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पंकज पल्लेवार आणि पूजा झरकर यांचा विवाह कासारवाडी येथील गंधर्वगरीमा लॉन्स येथे होता. लग्नकार्य मोठ्या उत्साहात पार पडलं. त्यानंतर फोटोसेशन सुरू झाले. पंकज आणि पूजा या दोघांचे सोन्याचे दागिने पूजाच्या आईकडे म्हणजेच छाया यांच्याकडे दिले होते. ते त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये ठेवले होते. परंतु फोटो काढायचा असल्याने त्यांनी पर्स शेजारील बाकड्यावर ठेवली याचाच फायदा घेत चोरट्याने ८ लाखांचे दागिने ठेवलेल्या पर्सवर डल्ला मारला.

- Advertisement -

पोलिसांत तक्रार दाखल

पुजाच्या आईच्या पर्समध्ये बाजूबंध, सोन्याचा हार, सोन्याचे नेकलेस, कर्णफुले, गंठण आणि पंकजच्या काही दागिन्यांचा समावेश असून तीन मोबाईल देखील पर्स मध्ये होते. त्यामुळे झरकर कुटुंबाला एक फोटो चांगलाच महागात पडला आहे. या घटने प्रकरणी रामचंद्र गणपतराव झरकर यांनी भोसरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -