घरमहाराष्ट्रपुल कोसळून अंत्ययात्रेसह २५ जण बुडाले

पुल कोसळून अंत्ययात्रेसह २५ जण बुडाले

Subscribe

सातारा जिल्ह्यातील खरोशी गाव येथे पुल कोसळून अंत्ययात्रेसह २५ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या बुडालेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यातील खरोशी गाव येथे पुल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये अंत्ययात्रेसह २५ जण नदीच्या पात्रात बुडाले आहेत. बुडालेल्या गावकऱ्यांना नदीच्या पत्रातून बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हा पुल कमकुवत झाल्याचे उघडकीस आले आहे.

नेमके काय घडले?

खरोशी गाव येथे नदीवर एक पुल बांधण्यात आला आहे. हा पुल अतिशय जीर्ण अवस्थेत होता. मात्र त्या कमकुवत पुलाकडे दुर्लक्ष केले जात होते. खरोशी गावातील गावकऱ्यांना हा पुल ओलांडून पलीकडे जावे लागायचे. एखाद्या व्यक्तीचे मरण झाले असल्यास या पुलावरुन अंत्ययात्र पलीकडे घेऊन जावी लागायची. अशी आज एक अंत्ययात्रा खरोशी गाव येथून निघाली होती. या अंतयात्रेत गावकरी आणि मरण पावलेल्या महिलेचे नातेवाईक मोठ्या संख्येने होते. अंत्ययात्रा खरोशी गावातील नदीवर असलेल्या पुलावरून जात असताना अचानक पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये अंत्ययात्रेसह २५ जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

जीर्ण झालेला पुल

खरोशी गावातील हा पुल अतिशय जीर्ण अवस्थेत होता. या पुलाची अक्षरश: दुरावस्था झाली होती. खरोशी गावातील गावकऱ्यांनी अनेकदा या पुलाची डागडुजी करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते आणि आज हा पुल कोसळल्याची घटना घडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -